16 January 2021

News Flash

NEET Result 2018, नीट परीक्षेचा निकाल जाहीर, तक्रार असेल तर मेल करा!

NEET Result 2018, CBSE NEET UG Result 2018 Live Updates सुप्रीम कोर्टाने नीट परिक्षेच्या निकालावर स्थगितीस नकार दिल्यानंतर अखेल निकाल जाहीर करण्यात आला.

NEET Result 2018 Live: नीट परीक्षेचा निकाल जाहीर, प्रतीकात्मक छायाचित्र

“CBSE NEET Result 2018  नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट परिक्षेच्या निकालाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानंतर अखेर सोमवारी (४ जून) सीबीएससीकडून निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांना आपला निकाल cbseneet.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे. या निकालासंदर्भात काही तक्रारी असतील तर तुम्ही आता neet.cbse@nic.in यावर मेल करू शकता.  देशभरातील विविध केंद्रांवर ७ मे रोजी NEET 2018 परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत ७२० पैकी ६९१ गुण मिळवत कल्पना कुमारी ही ऑल इंडिया रँकमध्ये पहिली आली आहे. तिला ९९.९९ टक्के गुण मिळाले आहेत. तर, नांदेडचा कृष्णा अगरवाल हा देशात ७वा आला आहे.

NEET परिक्षेच्या प्रश्नपत्रिका एकसारख्या नसल्याचा आरोप करीत ही परिक्षा रद्द करुन पुन्हा नव्या प्रश्नपत्रिकेसह परिक्षा घेण्यात यावी या मागणीसह तामिळनाडूतील काही विद्यार्थ्यांनी मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर निर्णय देताना मद्रास हायकोर्टाने नीटच्या निकालाला स्थिगिती दिली होती. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सीबीएससीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर मद्रास हायकोर्टाचा निकाल रद्द करीत सुप्रीम कोर्टाने नीटच्या निकालावरील स्थगिती उठवली. त्यानंतर सोमवारी लगेच निकाल जाहीर करण्यात आला. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरुप यांनी ही माहिती दिली.

NEET Result 2018, Updates :

 • प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची कामगिरी

 • नीट परिक्षेत पात्र ठरलेल्या पहिल्या ५० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील ३ जणांचा समावेश आहे. यामध्ये कृष्णा अग्रवाल (७वा), गुंजन गट्टानी (२१वा) तर लोकेश मांडलेचा (३७वा) रँकवर आले आहेत.
 • NEET Result 2018 : टॉपर उमेदवारांची यादी

 • जम्मू-काश्मीरमधील १२,५१५ उमेदवार नीट परिक्षेत पात्र; इतर राज्यांचा कामगिरी पहा….

 • कटऑफ टक्केवारी आणि गुण

 • MCI कडून देश स्तरावरील (ऑल इंडिया कोटा) १५ टक्के जागांसाठी समुपदेशन सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या राज्यांच्या कोट्यात येणाऱ्या ८५ टक्के जागांसाठी राज्य स्तरावर स्वतंत्रपणे समुपदेशन करण्यात येणार आहे.
 • CBSE NEET Counselling 2018 : समुपदेशनासाठी आवश्यक कागदपत्रे :
  समुपदेशनासाठी संबंधीत महाविद्यालयात जाताना उमेदवारांना आपल्यासोबत पुढील कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे.
  – प्रवेश पत्र
  – रँक पत्र किंवा AIQ रँकचे पत्र
  – १०वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका (जन्मतारखेच्या दाखल्यासाठी)
  – १२वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
  – ओळखपत्र
  – ८ पासपोर्ट साईज छायाचित्रे
  – Provisional allotment letter generated online after allotment
  – जात प्रमाणपत्र
 • NEET परिक्षेला बसलेल्या १३,२६,७२५ उमेदवारांपैकी ७ लाखांपेक्षा अधिक उमेदवार ही परिक्षा पास झाले आहेत. या पास झालेल्या उमेदवारांपैकी ६.३ लाख उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत.
 • नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दि मेडिकल काऊंसेलिंग कमिटी (एमसीसी) तसेच विविध राज्याच्या अधिकृत समुपदेशन यंत्रणेद्वारे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी समुपदेशन सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना स्वतंत्रपणे या समुपदेशन वर्गासाठी नाव नोंदणी करावी लागणार आहे.

हा निकाल जाहीर करण्यात येऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळत निकालाला स्थगिती देण्यास नकार दिला. दरम्यान, सीबीएससीने यापूर्वीच परिक्षेची उत्तर सूची जाहीर केली होती. ही उत्तर सूची पाहिल्यानंतर जर विद्यार्थ्यांना यावर काही आक्षेप असेल तर त्यांनी दोन दिवसांचा म्हणजेच २७ मेपर्यंतचा अवधी दिला होता.

देशभरातील १३,२६,७२५ उमेदवारांनी नीटची परिक्षा दिली होती. एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी सीबीएसईकडून ही प्रवेश परिक्षा घेतली जाते. नीटचा निकाल ५ जून रोजी जाहीर होणार होता. मात्र, एक दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीयसाठी नीट प्रवेश परिक्षा ६ मे रोजी घेण्यात आली होती. देशभरात यासाठी २२५५ केंद्रांवर ही परिक्षा झाली होती. देशभरात हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, मराठी, ओरिया, बंगाली, आसामी, तेलगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये ही परिक्षा घेण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2018 1:05 pm

Web Title: neet result 2018 cbse declares result at cbseneet nic in
टॅग Result
Next Stories
1 प्रमोशनसाठी बॉस बरोबर सेक्सची जबरदस्ती, नवऱ्याविरोधात दाखल झाला FIR
2 भाजपा विरोधक ओसामा बिन लादेनचे पाठिराखे : गिरीराज सिंह
3 धक्कादायक ! ‘चिकन करी’ बनवली नाही म्हणून आईचा केला खून
Just Now!
X