नेपाळचे पर्यटन मंत्री रबींद्र अधिकारी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात एकूण सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. एएनआयने नेपाळच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. नेपाळच्या तेहराथूम जिल्ह्यात हा अपघात झाला. अपघातानंतर उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. अपघात नेमका कशामुळे झाला याची चाचपणी केली जात आहे.

सुरुवातीला हेलिकॉप्टर बेपत्ता झालं होतं. याचवेळी पाठीबरा येथील स्थानिकांनी पोलिसांना एका ठिकाणी आगीचे मोठे लोट दिसत असल्याची माहिती दिली. पाहणी केली असता याच ठिकाणी हेलिकॉप्टरचा अपघात झाला असल्याचं समोर आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान कार्यालयाने आणि मंत्री परिषदेने तातडीची बैठक बोलावली होती. अपघात नेमका कशामुळे झाला याची कारणे शोधली जात आहेत.