काँग्रेस नेते राहुल गांधी बऱ्याचवेळा त्यांच्या वक्तव्याबद्दल ट्रोल होतात. त्यांनी केरळ मच्छिमारांसमवेत समुद्रात मारलेली उडी आणि पाण्यात पोहल्याचा किस्सा इंटरनेटवर गाजत आहे. ट्विटरवर ‘फिशिंग ट्रिप’ मधील त्याचे छायाचित्रे बघितल्यानंतर बऱ्याच लोकांनी यावर आपली मते व्यक्त केली आहेत. गांधींनी ओला टी-शर्ट आणि पँट घातली आहे, ज्यात त्यांचे पोटाचे स्नायू (अ‍ॅब्स) दिसत आहेत. यामुळे काहीजण सोशल मीडियावर याबद्दल बोलत आहेत.

बॉक्सर विजेंदरसिंग यांनीही ट्वीट करून लिहिले आहे की, “हे एका बॉक्सरचे अ‍ॅब्स आहेत सर्वात धिट आणि तंदुरुस्त असा लोकांचा नेता आहे @राहूलगांधीजी तुम्हाला अजून खुप लांब जायचे आहे.”

बुधवारी वायनाडचे खासदार कोल्लम जिल्ह्यातील मच्छीमारांसमवेत त्यांच्या जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते. मच्छीमारांनी मासे पकडण्यासाठी त्यांची जाळी टाकताना गांधींनी पाण्यात उडी मारली. त्यानंतर किनाऱ्यावर परत येण्यापूर्वी त्यांनी कमीतकमी १० मिनिटे समुद्रात पोहाण्यात घालविली प्रत्येकाला याचे आश्चर्य वाटले

गांधी समुद्रात पोहून बाहेर आल्यानंतर लगेचच हा फोटो घेण्यात आला आहे. अनेक नेटिझन्सनी राहुल गांधींकडून काही फिटनेस टिप्स मागत, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.