आणखीन एका चंद्राचा शोध लागला आहे असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला कदाचित त्यावर विश्वास बसणार नाही. पण असा नवीन चंद्र सापडल्याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील सेटी इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. हा नवा चंद्र नेपच्यूनवर असून त्याचं नामकरण या संशोधकांनी ‘हिप्पोकॅंप’ असं केलं आहे. या शास्त्रज्ञांनी केलेल्या प्राथमिक पाहणीतून या चंद्रावर जीवसृष्टी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता याठिकाणी एलियन्स असू शकतात असा वैज्ञानिकांना अंदाज आहे.

आतापर्यंत नेपच्यूनच्या १२ उपग्रहांचा शोध लागला आहे. आता हा चंद्र नेपच्यूनवरील १३वा उपग्रह आहे. ग्रीक पुराणांमध्ये ‘हिप्पोकॅंप’ नावाच्या एका काल्पनिक प्राण्याचा उल्लेख येतो. त्या प्राण्याचे नाव या ग्रहाला देण्यात आले आहे. ‘हिप्पोकॅंप’वरील वातावरण प्रचंड थंड आहे. संशोधनानंतर येथील सूर्यप्रकाश आणि इतर गोष्टी जीवसृष्टीला पोषक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यामुळेच येत्या काळात इथे एलियन्स सापडू शकतील अशी शास्त्रज्ञांना आशा आहे.