भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाच्या जवानांच्या दिमतीला प्रथमच अद्यायावत स्पोट्र्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) देण्यात आल्या आहेत.
दुर्गम भागात सैन्याच्या हालचाली सुकर व्हाव्यात म्हणून हे प्रायोगिक पाऊल उचलण्यात आल्याचे आयटीबीपीचे महासंचालक कृष्णा चौधरी यांनी सांगितले.
सुरुवातीच्या टप्प्यात अशी चार वाहने घेतली असून त्यात दोन टोयोटा फॉच्र्युनर आणि दोन फोर्ड एंडेव्हर कारचा समावेश आहे. त्याची किंमत प्रत्यकेी २५ लाखांच्या घरात आहे. लडाखमधील समुद्रसपाटीपासून १३,००० फूट उंचीवरील बुत्र्से आणि दुंगती येथे आणि अरुणाचल प्रदेशमधील ६००० फुटांवरील मेंचुका येथे ही वाहने तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्या चालकांना आयटीबीपीच्या चंदिगड येथील तळावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. या वाहनांच्या अतर्गत रचनेत रेडिओ संच, ६ ते ७ जवान आणि आणि त्यांची शस्त्रास्त्रे बसू शकतील यासाठी काही बदल करण्यात आले आहेत.