N440K आणि E484Q हे दोन स्ट्रेन तसेच महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येमध्ये झालेली वाढ याचा परस्पराशी काहीही संबंध नाहीय, असे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी आज स्पष्ट केले.

N440K आणि E484Q हे दोन स्ट्रेन भारतातच नाही, तर अन्य देशातही आढळून आले आहेत. भारतातील काही राज्यांमध्ये हे स्ट्रेन आढळले होते असेआयसीएमआरच्या महासंचालकांनी सांगितले.

मार्च आणि जुलै २०२० मध्ये E484Q स्ट्रेनचे महाराष्ट्रात चार सिक्वेन्स आढळले होते. मे ते सप्टेंबर २०२० मध्ये तेलंगण, आंध्र प्रदेश आणि आसाममध्ये N440K मध्ये १३ वेळा परिवर्तन झाल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले.