News Flash

एनपीआर आणि एनसीआर यांचा परस्परसंबंध नाही – जी. किशन रेड्डी

विरोधी पक्ष ‘माइंड गेम’ खेळून त्याद्वारे लोकांचा सरकारवरील विश्वास दूषित करू पाहात आहेत.

| December 27, 2019 12:41 am

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी

हैदराबाद : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) ही राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) लागू करण्याची पहिली पायरी असल्याचा विरोधी पक्षांचा दावा निराधार असल्याचे सांगून केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी गुरुवारी तो फेटाळून लावला. या दोहोंमध्ये काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले.

एनपीआरच्या अद्ययावतीकरणाच्या कामाला केरळप्रमाणेच तेलंगणातही स्थगिती द्यावी, अशी विनंती एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तेलंगणातील मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना भेटून केली होती. एनपीआर हे एनआरसीच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर रेड्डी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यादीत समाविष्ट करावयाच्या व्यक्तीच्या पालकांचे जन्मस्थळ, आधार कार्ड क्रमांक आणि निवासाचे अखेरचे ठिकाण यांच्याशी संबंधित ३ किंवा ४ स्तंभांची भर घालून, पूर्वीच्या यूपीए सरकारने २०१० सुरू केलेली एनपीआरची प्रक्रिया आमचे सरकार केवळ पुढे चालवत आहे. हा एनपीआरचा आवश्यक भाग आहे, असे रेड्डी यांनी सांगितले.

विरोधी पक्ष ‘माइंड गेम’ खेळून त्याद्वारे लोकांचा सरकारवरील विश्वास दूषित करू पाहात आहेत. गरिबांचे शत्रू असलेल्या या ‘नव गोबेल्स’च्या प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन मी लोकांना करतो, असेही रेड्डी म्हणाले.

‘एनपीआर ही एनआरसीची नांदी असल्याची जी हेतुपुरस्सर आणि निराधार प्रचार मोहीम विरोधी पक्ष आणि काही माध्यमे राबवत आहेत, तिचा मी तीव्र निषेध करतो. या दोन्हीमध्ये काही संबंध नसल्याचे मी स्पष्ट करू इच्छितो. विद्यमान एनपीआर हा २०२१ सालच्या जनगणनेचा भाग आहे’, असे रेड्डी यांनी एका निवेदनात सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:41 am

Web Title: no link between npr and nrc says g kishan reddy zws70
Next Stories
1 जमावाला जाळपोळ व हिंसाचारास प्रवृत्त करणे म्हणजे नेतृत्व नव्हे
2 उत्तर प्रदेशातील हिंसाचारात ‘बाहेरच्या’ लोकांचा सहभाग असल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष
3 गुजरातमधील माजी आयएएस अधिकाऱ्याच्या ३६ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच
Just Now!
X