गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याला आपला कोणताही विरोध नसल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितल़े  तसेच मोदींच्या उमेदवारीला आपला विरोध असल्याचे वृत्त पूर्णत: खोटे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आह़े
माझा विरोध असल्याचे काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे चौहान यांनी ट्विटर या संकेतस्थळावर म्हटले आह़े  चौहान यांनी मोदींच्या उमेदवारीला विरोध केल्याच्या वृत्ताने गेले काही दिवस उलटसुलट चर्चा सुरू झाली होती़  त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी ग्वाल्हेर येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात चौहान  यांचे कौतुक करून त्यांची तुलना मोदी यांच्याशी केल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले होत़े. मात्र चौहान यांनी या चर्चेला आता पूर्णविराम दिला आह़े
मोदींचे वक्तव्य भाजपला अमान्य
मोदी यांनी २०१७ पर्यंत गुजरातचीच सेवा करण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती़  त्याच्या वक्तव्याबाबत कोणतेही तर्कवितर्क लढवू नयेत, असे सांगत भाजपकडून मात्र पंतप्रधानपदासाठी मोदी यांनाच उमेदवारी देण्याचे संकेत देण्यात आले आहेत़  मोदी यांनी २०१७ पर्यंत गुजरातशीच बांधील राहण्याचे गुरुवारी घोषित केले आणि प्रकटपणे त्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे लक्ष्य असल्याचे म्हटले नाही़  मात्र त्यामुळे त्यांनी भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीतून माघार घेतली आहे, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकारांना सांगितल़े