अधून-मधून २ हजार रुपयाची नोट बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु असतात. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. २ हजाराची नोट बंद करणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. २ हजाराची नोट बंद करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर २ हजाराची नवी नोट बाजारात आली.

येत्या काही दिवसात १० रुपयाचे प्लास्टिक चलन बाजारात आणणार आणणार असल्याची माहिती सरकारने लोकसभेला दिली. पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर प्लास्टिक चलनाचा हा प्रयोग केला जाणार आहे. २ हजाराची नोट बंद करण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी लिखित उत्तरामध्ये लोकसभेला दिली.

नजीक भविष्यात २ हजाराची नोट बंद करण्याचा कुठला विचार आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. महात्मा गांधींचा फोटो असलेल्या ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटेच्या आकाराची माहिती यावेळी देण्यात आली. काळा पैसा रोखण्यासाठी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटेवर बंदी घातली. १० रुपयाच्या प्लास्टिक नोटेची चाचणी कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये करण्यात येणार आहे.