भाजपच्या लोकसभा उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात बाबा रामदेवांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
उत्तराखंडचे भाजपचे प्रभारी राधामोहन सिंग म्हणाले की, बाबा रामदेव हे देशहितासाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे. देशाचा विकास व्हावा, हीच बाबा रामदेव यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांचा भाजपच्या उमेदवारांची यादी तयार करण्यामागे कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही आणि त्याबाबतची सुरू असलेली चर्चा पूर्णपणे खोटी असल्याचेही सिंग म्हणाले.
बाबा रामदेव यांना काही जागांवर त्यांच्या मर्जीतील उमेदवार भाजपकडून उभे करण्याची इच्छा असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. यावरून रामदेव बाबांच्या भाजपच्या उमेदवार यादी तयार करण्यामागील सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते.