आपल्या सरकारचा बहुतांश वेळ दहशतवादाची समस्या आणि ऊर्जा संकट हाताळण्यात खर्ची पडत असल्यामुळे विकास कामांसाठी फारसा वेळ उरत नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे.
उत्तर वझिरिस्तान प्रांतातील दहशतवाद्यांविरुद्ध गेल्या वर्षी जून महिन्यात सुरू करण्यात आलेली लष्करी मोहीम अखेरचा दहशतवादी संपेपर्यंत सुरू राहील, असे सांगून शरीफ यांनी दहशतवाद निपटून काढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढल्याबद्दल त्यांनी लष्कराची प्रशंसा केली.आपले सरकार येत्या दोन ते तीन वर्षांत ऊर्जा संकटावरही मात करेल असा दावा शरीफ यांनी केला. नैसर्गिक वायू आणि वीज याशिवाय कुठलाही देश प्रगती करू शकत नाही असेही ते म्हणाले.