20 September 2018

News Flash

‘खोटी स्वप्ने दाखवणाऱ्यांवर विश्वास ठेऊन उपयोग नाही’

कर्नाटकात राहुल गांधीची मोदींवर टीका

कर्नाटकातील बेल्लारी येथील प्रचारसभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी.

‘जे तुम्हाला खोटी आश्वासने देतात, खोटी स्वप्ने दाखवतात त्यांच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. काँग्रेस पक्ष जे सांगतो ते करुन दाखवतो. नरेंद्र मोदींचे शब्द पोकळ असतात. ते जे बोलतात ते करीत नाहीत,’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान बेल्लारी येथे ते बोलत होते. राहुल गांधी सध्या चार दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून या दरम्यान ते बेल्लारी, कोपल, रायचूर, गुलबर्गा आणि बदर येथे प्रचार सभा घेणार आहेत.

HOT DEALS
  • Lenovo Phab 2 Plus 32GB Gunmetal Grey
    ₹ 17999 MRP ₹ 17999 -0%
    ₹900 Cashback
  • Jivi Energy E12 8 GB (White)
    ₹ 2799 MRP ₹ 4899 -43%


राहुल गांधी म्हणाले, संसदेतील आपल्या एक तासाच्या लांबलचक भाषणात नरेंद्र मोदी देशाच्या भविष्याबाबत, तरुणांच्या रोजगाराबाबत किंवा शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपला तास केवळ काँग्रेस पक्षावरील टीकेवर आणि भूतकाळातील गोष्टी सांगण्यातच घालवला. देशाला यात रस नाही, तर आपल्या पंतप्रधानाकडून देशाच्या भविष्याबाबत ऐकण्यात रस आहे.


मोदी सरकारने फ्रान्सच्या कंपनीकडून राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली. त्यासाठी ते पॅरिसला गेले तिकडे जाऊन त्यांनी स्वतः याबाबतचा करार बदलला. त्यानंतर नुकतेच या कंपन्यांचे कंत्राट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला देण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी हे कंत्राट जप्त केले आणि आपल्या मित्राला दिले, असा आरोप राहुल यांनी केला.

सोनियाजी, आम्ही आणि तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येण्याची वेळ आता आली आहे. सोनिया गांधींना ज्यावेळी गरज होती त्यावेळी तुम्ही त्यांना मदत केली, त्यांचा स्विकार केला. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला संधी द्या असे आवाहन राहुल गांधी यांनी उपस्थितांना केले.

First Published on February 10, 2018 4:06 pm

Web Title: no use by believing in false dreams for you says rahul gandhi