02 March 2021

News Flash

फ्लिपकार्ट आता मराठीतही; राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला

मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसे मध्ये झाला होता संघर्ष.

मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अ‍ॅमेझॉन आणि मनसे मध्ये झालेला संघर्ष ताजा असताना, आता ई कॉमर्स क्षेत्रातील आणखी एक आघाडीची कंपनी फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांना मराठीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

ऑक्टोबर महिन्यात मनसेने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने मराठीत अ‍ॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर फ्लिपकार्टने महत्त्वाचं आश्वासन दिलं होतं. सध्या उपलब्ध असलेल्या भाषांव्यतिरिक्त अन्य अनेक भाषांचाही फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर समावेश असेल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार फ्लिपकार्टने आता ग्राहकांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला आहे.

फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय बाजारपेठेने मराठी भाषा सादर करून आपल्या प्रादेशिक भाषेच्या सेवेला अधिक बळकटी दिली आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे. फ्लिपकार्ट अॅप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा महत्त्वाच्या भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सर्वसमावेशक सहज उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी फ्लिपकार्टने अधिक बळकट केली आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. लाखो फ्लिपकार्ट वापरकर्त्यांना वैयक्तिक आणि बोलीभाषेतील अनुभव देण्यासाठी ५.४ दशलक्षांहून अधिक शब्दांचे भाषांतर आणि लिपित लेखन (ट्रान्सलिटरेशन) करण्यात आले आहे. फ्लिपकार्टच्या ‘लोकलायझेशन अॅण्ड ट्रान्सलेशन प्लॅटफॉर्म’वर उपलब्ध ही सोय ग्राहकांना ईकॉमर्सचा अथपासून इतिपर्यंत सहजसुंदर अनुभव देणार आहे.

ई-कॉमर्सकडे वळणाऱ्या भारतीय ग्राहकांसमोरील समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण पर्याय देण्याच्या फ्लिपकार्टच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या व्यासपीठावर प्रादेशिक क्षमतांचा विकास करण्यात येत आहे. प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या लाखो ग्राहकांसमोरील मुख्य अडथळा यामुळे दूर होणार आहे. या क्षेत्रातील घडामोडींनुसार, भारतीय भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या २०२१ पर्यंत ७५ टक्के असेल आणि द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमधील फ्लिपकार्ट वापरकर्त्यांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक असल्याने प्रादेशिक सेवांचा विस्तार वाढवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

फ्लिपकार्टचे चीफ प्रोडक्ट अॅण्ड टेक्नॉलॉजी ऑफिसर जयेंद्रन वेणुगोपाल म्हणाले, “भारतातील ग्राहकांसाठी ई-कामॅर्स अधिक अधिक समीप आणणे व त्यात नाविन्यता आणणे या आमच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षांत आमचा प्रादेशिक भाषांचा व्याप लक्षणीय प्रमाणात वाढवला आहे. आमच्या व्यासपीठावरील सहा प्रादेशिक भाषांमध्ये मराठीचा समावेश करणे म्हणजे ई-कामॅर्स अधिक सर्वसमावेशक करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे आणि भाषेचे अडसर दूर करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असेल. या सर्व घडामोडी म्हणजे फ्लिपकार्टवर प्रादेशिक सेवांचा विस्तार करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग असून त्यामुळे देशभरातील लाखो ग्राहकांसाठी ई-कामॅर्स अधिक सहज उपलब्ध आणि सोयीस्कर होऊन भारतात ई-कामॅर्सचे लोकशाहीकरण करण्यात कळीची भूमिका बजावेल.”

आणखी २०० दशलक्ष ग्राहकांना ऑनलाइन आणण्याच्या आपल्या प्रयत्नांचा भाग म्हणून फ्लिपकार्टने व्हिडीओ, व्हॉईस आणि प्रादेशिक या तीन विभागांत अनेक उपक्रम सादर केले आहेत. २०१९ पासून ज्या ९५ टक्के ग्राहकांनी प्रादेशिक भाषेचा वापर आमच्या व्यासपीठावर केला, ते अजूनही प्रादेशिक भाषेचाच वापर करत आहेत. यामुळे डिजिटल व्यासपीठांवर प्रादेशिक भाषांना पसंती दिली जाते, हे स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 6:06 pm

Web Title: now customer can use marathi language on flipkart dmp 82
Next Stories
1 IAF मिशन मोडवर, देशातील दुर्गम भागात पोहोचवणार लसी
2 लसीकरण १०० टक्के सुरक्षेची हमी देत नाही, मास्क वापरणं आवश्यकच – तज्ज्ञांचा सल्ला
3 भारतात इलेक्ट्रिक ट्रॅकवरुन पहिल्यांदाच धावली दीड किमी लांबीची डबल स्टॅक मालगाडी
Just Now!
X