News Flash

अभियंता, इंजिनीयर, பொறியாளர், എഞ്ചിനീയർ…. ; इंजिनीअरिंगचं शिक्षण आता मराठीसह आठ भाषांतून

अभ्यासासाठी लागणारं सर्व साहित्यही या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

(संग्रहित छायाचित्र)

AICTE अर्थात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आता महाविद्यालयांना आठ भाषांमध्ये इंजिनीयरिंगचं शिक्षण देण्याची परवानगी दिली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून मराठीसह हिंदी, बंगाली, तेलुगू, तमिळ, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या आठ स्थानिक भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेता येणार आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण तसंच आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. आत्तापर्यंत इंग्रजीच्या भीतीने अनेक हुशार विद्यार्थी इंजिनीयरिंगपासून दूर राहिले आहे. जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, चीन अशा देशांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषांमधून शिक्षण दिलं जातं.

AICTEचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की विद्यार्थ्यांना जर त्यांच्या मातृभाषेमध्ये तांत्रिक शिक्षण घेता आलं तर त्यांचा पाया मजबूत व्हायला मदत होईल. आम्हाला पूर्ण देशामधून एकूण ५०० अर्ज आले आहेत. भविष्यात आम्ही इंजिनीयरिंगचं पदव्युत्तर शिक्षण आणखी ११ भाषांमधून देण्यासंदर्भातलं नियोजन करत आहोत.

तसंच AICTE या सर्व कोर्सच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तकं,नोट्स हे सर्व काही या भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्वयम आणि MOOC या पोर्टल्सवरचं साहित्यही या भाषांमध्ये भाषांतरीत केलं असल्याचं सहस्रबुद्धे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 11:42 am

Web Title: now engineereing courses available in marathi and 7 more languages vsk 98
Next Stories
1 मोदी 2.0 सरकार सर्वेक्षण : अबकी बार गडकरी… पंतप्रधान म्हणून महाराष्ट्राच्या मनात गडकरीच
2 भारतामधील १२ वर्षांवरील सर्वांना लवकरच लस?; Pfizer मागितली केंद्राकडे परवानगी
3 “बाबा रामदेव तर योगाचा कोका कोला”; बिहार भाजपाध्यक्षांची पोस्ट चर्चेत
Just Now!
X