20 November 2017

News Flash

ऑक्सफर्ड नवशब्दांमध्ये ‘ओम्नीशॅम्बल्स’चे वर्चस्व!

इंग्रजी भाषेला दरवर्षी नवनव्या शब्दरत्नांची भेट देणाऱ्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने यंदा वर्षांतील ब्रिटनच्या राजकीय,

पी.टी.आय. ,लंडन | Updated: November 14, 2012 2:16 AM

इंग्रजी भाषेला दरवर्षी नवनव्या शब्दरत्नांची भेट देणाऱ्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने यंदा वर्षांतील ब्रिटनच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती अचूक टिपणाऱ्या  ‘ओम्नीशॅम्बल्स’(अजागळ व्यवस्थापन) या शब्दाला ‘वर्ड ऑफ द इयर’ किताबाने गौरविले आहे. ब्रिटनमधील  माध्यमांची अस्तंगत अवस्थेला चाललेली अवस्था आणि सरकारच्या धोरणांमधील प्रमादांचा या शब्दाला संदर्भ लावण्यात आलेला आहे.
 ‘ओम्नीश्ॉम्बल्स’ या शब्दाची  व्याख्या करताना ऑक्सफर्डने प्रचंड मोठय़ा चुका, गोंधळ यांच्यामुळे तयार झालेली र्सवकष अजागळ अवस्था अशी  केली आहे. २०१२ सालामध्ये वापरण्यात आलेली सर्वात उत्तम संकल्पना म्हणून तिचा गौरव संस्थेने केला आहे. इंग्रजी भाषा जगातील बदलांमुळे तयार झालेल्या शब्दांचे स्वागत करीत असते. याबाबतचा निकष हा केवळ  वर्षभरात  सर्वाधिक परिणामकारक ठरणाऱ्या गोष्टींनुसार ठरत असतो. यात एक शब्द ब्रिटनचा असतो, तर दुसरा शब्द हा अमेरिकेचा असतो.  ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट म्हणजेच ‘गिफ’ या शब्दाला यंदा अमेरिकेतील शब्दांमधील सम्राट म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. इंटरनेटवरील छायाचित्रांचे सर्वसामान्य स्वरूप  म्हणून ‘गिफ इमेज’ ओळखली जाते.     

‘ओम्नीशॅम्बल्स’
ब्रिटनमधील ‘द थिक ऑफ इट’ या लोकप्रिय विडंबन मालिकेच्या लेखकांनी या जोडशब्दाची निर्मिती केली. सरकारी कामांच्या दिरंगाईपूर्ण कामाचा, लंडन ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीमधील ढिसाळ नियोजनावर या मालिकेमधील भागांमध्ये जे विनोदपूर्ण ताशेरे ओढण्यात आले, त्यात या शब्दाचा  वापर करण्यात आला होता.  या शब्दाच्या भाषिक उत्पादकतेसोबत समाजामध्ये त्याच्या लोकप्रिय झालेल्या वापरामुळे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने हा शब्द निवडल्याचे शब्दाभ्यासक सुझी डेन्ट यांनी स्पष्ट केले. लंडन ऑलिम्पिकच्या नियोजनाच्या यशस्वितेबाबत अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार मिट रोम्नी यांनी जाहीररीत्या शंका व्यक्त केली होती. त्याबाबत माध्यमांनी  ‘रोम्नीश्ॉम्बल्स’ हा वृत्तांमध्ये वापरलेला जोडशब्द या शब्दाची लोकप्रियता स्पष्ट करणारा असल्याचेही डेन्ट म्हणाल्या. ओम्नीशेम्बल्स या शब्दाने फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे या वाचकप्रिय कादंबरीमुळे तयार झालेल्या ‘ममी पोर्न’ या शब्दावर मात केली.

गिफ
ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट (गिफ) हे कॉम्प्यूसव्‍‌र्ह कंपनीने १९८७ साली तयार केलेले छायाचित्रांचे स्वरूप आहे. इंटरनेटवरील बहुतांश छायाचित्रे या स्वरूपातील असतात. या स्वरूपातील छायाचित्रे अ‍ॅनिमेशनसाठीही उपयुक्त ठरतात. ऑक्सफर्ड अमेरिकी डिक्शनरीने हा शब्द निवडताना, त्याच्या अस्तित्वाला कुठल्याही सांस्कृतिक वा तांत्रिक वादळाने धक्का दिला नसल्याचे म्हटले आहे. संशोधन आणि पत्रकारितेमध्ये त्याचा गांभीर्याने वापर होत असल्याबद्दलही त्याचा गौरव करण्यात आला आहे. ‘सुपरस्ट्रॉम’ आणि ‘नोमोफोबिया’ या शब्दांना मागे टाकून गिफने बाजी मारली आहे. 

First Published on November 14, 2012 2:16 am

Web Title: omnishambles was named britains word of the year