पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मिदनापूरमध्ये सुरु होती आणि अचानक मांडव कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत १५ जण जखमी झाल्याचेवृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी गर्दी झाली होती. एका मांडवावर ताण आला आणि तो मांडव खाली कोसळला. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या घटनेत १५ जण जखमी झाल्याचेही समजते आहे. तसेच या सगळ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या भाषणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र त्यांचे भाषण सुरू असतानाच लोकांची गर्दी वाढल्याने मांडव कोसळल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असतानाच ही घटना घडली. या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारपूस केली आणि त्यानंतर आपले भाषण सुरु केले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.