‘पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. काही वर्षांपूर्वी संसदेने संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग असल्याचा ठरावही संमत केला होता. त्यामुळे संसदेने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याबाबत लष्कराला आदेश दिल्यास आम्ही निश्चित कारवाई करू’, असे मत लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी व्यक्त केले. लष्करप्रमुखांनी शनिवारी येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, लष्कराने प्रशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. कारण आगामी काळातील युद्धे ही गुंतागुंतीची व यंत्रणाकें द्री असतील. उत्तर सीमेवरील कुठलीही आव्हाने स्वीकारण्याची आमची तयारी आहे. तेथे आधुनिक शस्त्रप्रणाली तैनात केल्या जातील.

संरक्षण प्रमुखपद निर्माण करण्याचा निर्णय हे लष्कराच्या तीनही सेनादलांचे एकात्मीकरण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे पाऊल असून लष्कर त्या उपाययोजनेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.