16 December 2017

News Flash

यशपाल, रझा यांना पद्मविभूषण, मंगेश पाडगावकर, राजेश खन्ना, शर्मिला टागोर यांना पद्मभूषण, तर नाना पाटेकर, श्रीदेवी यांना पद्मश्री

चित्रकार हैदर रझा, प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. यशपाल यांना पद्मविभूषण, तर कविवर्य मंगेश पाडगावकर, दिवंगत

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली | Updated: January 26, 2013 4:06 AM

चित्रकार हैदर रझा, प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. यशपाल यांना पद्मविभूषण, तर कविवर्य मंगेश पाडगावकर, दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना, अभिनेत्री शर्मिला टागोर, क्रिकेटपटू राहुल द्रविड, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कॉम यांच्यासह शिवाजीराव गिरीधर पाटील, डॉ. कनक रेळे, उद्योगपती आदि गोदरेज, डॉ. नंदकुमार लाड यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. चित्रपट अभिनेता नाना पाटेकर, श्रीदेवी, जयमाला शिलेदार, सुरेश तळवलकर, सुधा मल्होत्रा, रमेश सिप्पी, नीलिमा मिश्रा, मिलींद कांबळे, कल्पना सरोज, डॉ. राजेंद्र अच्युत बडवे यांच्यासह महाराष्ट्रातील १९ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.शुक्रवारी रात्री उशीरा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी चार पद्मविभूषण, २४ पद्मभूषण आणि ८० पद्मश्री अशा एकूण १०८ पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली. पद्म पुरस्कारांच्या यादीत २४ महिलांचा समावेश असून, ११ पुरस्कार विदेशी नागरिक, अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे विदेशी नागरिक आणि मरणोत्तर या विभागात देण्यात आले आहेत. पद्म पुरस्कारांचे मार्च आणि एप्रिल महिन्यात वितरण होईल.
महाराष्ट्रातील मानकरी
पद्मभूषण : डॉ. श्रीमती कनक रेळे, स्व. राजेश खन्ना (कला), शिवाजीराव गिरधर पाटील (सार्वजनिक जीवन), आदि गोदरेज (व्यापार व उद्योग), डॉ. नंदकुमार लाड (औषधशास्त्र), मंगेश पाडगावकर (साहित्य आणि शिक्षण).      पद्मश्री : श्रीदेवी, ब्रम्हदेव पंडित, नाना पाटेकर, जयमाला शिलेदार, सुरेश तळवलकर, अपूर्ब किशोर बीर, सुधा मल्होत्रा, रमेश सिप्पी, माहरुख तारापोर (कला). नीलिमा मिश्रा (समाजकार्य), मुस्तनसीर बर्मा, प्रा. दीपक फाटक, शरद पांडुरंग काळे (विज्ञान आणि अभियांत्रिकी), मिलींद कांबळे, कल्पना सरोज (व्यापार आणि उद्योग). डॉ. राजेंद्र अच्युत बर्वे, डॉ. अमित मायदेव, डॉ. सुंदरम नटराजन (औषध शास्त्र).
 पद्मपुरस्कार विजेते पद्मविभूषण
१) रघुनाथ मोहपात्रा (कला), ओरिसा. २) हैदर रझा (कला), दिल्ली. ३) प्रा. यशपाल (विज्ञान आणि अभियांत्रिकी), उत्तर प्रदेश. ४) प्रा. रोड्डम नरसिंहा (विज्ञान आणि अभियांत्रिकी), कर्नाटक.
पद्मभूषण
कला :  डॉ. रामानायडू डग्गुबाती (आंध्र), श्रीमती श्रीराममूर्ती जानकी (तामिळनाडू), शर्मिला टागोर (दिल्ली), डॉ. सरोजा वैद्यनाथन (दिल्ली), अब्दुल रशीद खान (प. बंगाल), स्व. जसपाल भट्टी (पंजाब). विज्ञान आणि अभियांत्रिकी : डॉ. ए. एस. पिल्ले (दिल्ली), डॉ. विजयकुमार सारस्वत (दिल्ली), डॉ. अशोक सेन (उत्तर प्रदेश), डॉ. बी. एन. सुरेश (कर्नाटक), प्रा. सत्या अतलुरी (अमेरिका), प्रा. जोगेशचंद्र पती (अमेरिका). व्यापार आणि उद्योग : आर. त्यागराजन (तामिळनाडू). साहित्य आणि शिक्षण : प्रा. गायत्री चक्रवर्ती स्पिव्हाक (अमेरिका). लोकसेवा : हेमेंद्र सिंह पंवार (मध्य प्रदेश), डॉ. एम. के. भान (दिल्ली). क्रीडा : राहुल द्रविड (कर्नाटक), मेरी कोम (मणिपूर).
पद्मश्री
कला : गजम अंजैया (आंध्र), भारती बंधू (छत्तीसगढ), बी. जयश्री (कर्नाटक),  कैलाशचंद्र मेहर (ओरिसा), सुरभी बाबजी (आंध्र), लक्ष्मी नारायण सथीराजू (तामिळनाडू), पी. माधवन नायर उर्फ मधु (केरळ), जी. बी. बोरबायन (आसाम), श्रीमती हिल्दा मित लेपचा (सिक्कीम), बलवंत ठाकूर (जम्मू आणि काश्मीर), पुरणदास बौल (प. बंगाल), राजेंद्र टिक्कू (जम्मू आणि काश्मीर), पाब्लो बार्थोलोमेव (दिल्ली), शाकीर अली (राजस्थान). समाजकार्य : एस. के. एम. माईलानंदन (तामिळनाडू), रीमा नानावती (गुजरात), झरना धारा चौधरी (बांगलादेश), स्व. डॉ. राम कृष्ण (उत्तर प्रदेश), स्व. मंजु भारत राम (दिल्ली). विज्ञान आणि अभियांत्रिकी : अविनाश चंदर (दिल्ली), प्रा. संजय गोविंद धांडे (उत्तर प्रदेश), प्रा. शंकर कुमार पाल (प. बंगाल), डॉ. एम. आर. राजू (आंध्र), परा. अजय के, सूद (कर्नाटक), प्रा. के विजयराघवन (कर्नाटक), डॉ. मनिंद्र अग्रवाल (उत्तर प्रदेश), डॉ. जे. गौरीशंकर (आंध्र). व्यापार आणि उद्योग : वंदना लुथ्रा (दिल्ली), राजश्री पती (तामिळनाडू), एच. पी. बरुआ (आसाम). औषध शास्त्र : सुदर्शन अग्रवाल (दिल्ली), सी. व्ही. सुंद्रा राम (आंध्र), डॉ. ताराप्रसाद दास (ओरिसा), प्रा. टी. व्ही. देवराजन (तामिळनाडू), प्रा. सरोज गोपाल (उत्तर प्रदेश), डॉ. प्रमोदकुमार जुल्का (दिल्ली), डॉ.गुलशन राय खत्री (दिल्ली), डॉ. गणेशकुमार मणी (दिल्ली), प्रा. कृष्णचंद्र चुनेकर (उत्तर प्रदेश), डॉ. विश्वकुमार गुप्ता (दिल्ली).  साहित्य आणि शिक्षण : प्रा. मोहम्मद शराफ-ए-आलम (बिहार), डॉ. राधिका हर्झबर्गर (आंध्र), जे. मालसावमा (मिझोराम), देवेंद्र पटेल (गुजरात), डॉ. रमाकांत शुक्ला (दिल्ली), प्रा. अख्तरुल वासी (दिल्ली), प्रा. अन्विता अब्बी (दिल्ली), निदा फाझली (मध्य प्रदेश), सुरेंद्रकुमार शर्मा (दिल्ली), स्व. सलीख लखनवी (प. बंगाल), प्रा. नोबोरू काराशिमा (जपान), ख्रिस्तोफर पिन्नी (ब्रिटन). क्रीडा : प्रेमलता अग्रवाल (झारखंड), योगेश्वर दत्त (हरयाणा), एच. एन. गिरीशा (कर्नाटक), सुभेदार मनोज विजयकुमार (हिमाचल), सुभेदार बजरंग लाल ताखर (राजस्थान). फॅशन डिझाईनिंग : रितु कुमार. पुरातत्व : डॉ. रवींद्र सिंग बिश्त (उत्तर प्रदेश).

First Published on January 26, 2013 4:06 am

Web Title: padma awards to rajesh khanna sharmila tagore rahul dravid