08 April 2020

News Flash

विंग कमांडर अभिनंदन यांना टॉर्चर करणाऱ्या पाक कमांडोचा भारतीय सैन्याकडून खात्मा

अभिनंदन यांना पकडल्यानंतर पाकिस्तानने एक फोटो प्रसिद्ध केला होता, या फोटोत त्यांच्या मागे एक पाक सैनिक दिसत असून तोच हा कमांडो असल्याचा दावा करण्यात आला

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान

आपल्या मिग-२१ लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडणाऱ्या आणि टॉर्चर करणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे.

बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान पीओकेत कोसळले होते. त्यानंतर या विमानाचा पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते तसेच त्यावेळी त्याला एका पाकिस्तानी कमांडोने मारहाणही केली होती. सुभेदार अहमद खान असे अभिनंदनला मारहाण करणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचे नाव आहे. तो पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कार्यरत होता. टाइम्सनाऊ न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

नियंत्रण रेषेवर १७ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवा सेक्टरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास खान मदत करीत होता. या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवताना पाककडून समोरील भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा मारा केला जात होता. याला भारतीय जवानांनी गोळीबाराने चोख प्रत्युत्तर दिले होते. या गोळीबारात खानचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानी सैन्याने पकडल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने अभिनंदन यांचा एक फोटो प्रसिद्ध केला होता. या फोटोमध्ये अभिनंदन यांच्या मागे एक दाढीवाला सैनिक दिसत असून तोच हा ठार झालेला पाकिस्तानी कमांडो सुभेदार अहमद खान असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 6:30 pm

Web Title: pak commando who tortured wc abhinandan vardhman killed by indian soldiers at loc aau 85
Next Stories
1 धक्कादायक! महिलेला लिफ्ट दिल्यानंतर कारमध्ये सामूहिक बलात्कार
2 Triple Talaq: भर बाजारात तलाक…तलाक…तलाक म्हणत पळून गेला पती, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3 उत्तर प्रदेश : योगी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच मंत्र्याचे राजीनामासत्र
Just Now!
X