News Flash

शस्त्रसंधीचे उल्लंघन: पूंछमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच

जम्मू-काश्मीरमधील पूंछ विभागातील हामीरपूर आणि बालाकोटमधील सीमेवर पाकिस्तानी सैन्याने जोरदार गोळीबार केला.

| August 19, 2013 04:33 am

जम्मू-काश्मीरमधील पूंछ विभागातील हामीरपूर आणि बालाकोटमधील सीमेवर पाकिस्तानी सैन्याने जोरदार गोळीबार केला. त्याचबरोबर मानकोट आणि मेंधारमधील नागरी भागामध्येही सीमेपलीकडून जोरदार गोळाबार करण्यात आल्याचे लष्कराच्या अधिकाऱयांनी सांगितले.
रविवारी रात्रीपासून पूंछमधील हामीरपूर आणि बालाकोट भागातील सीमेवर आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने गोळीबार करण्यात येतो आहे, असे लष्कराचे प्रवक्ते एस. एन. आचार्य यांनी सांगितले. पाकिस्तानकडून स्वयंचलित शस्त्रास्त्रांच्या साह्याने भारतीय छावण्यांवर गोळीबार करण्यात येतो आहे. त्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. रात्रभर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता आणि त्याला प्रत्युत्तर देण्यात येत होते, असे आचार्य म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 4:33 am

Web Title: pakistan continues to violate ceasefire heavy exchange of fire underway
टॅग : Firing On Loc
Next Stories
1 जीएसएलव्ही डी-५ प्रक्षेपकाचे उड्डाण रद्द
2 युद्धसामग्रीने पेट घेतल्यामुळे ‘सिंधुरक्षक’मध्ये स्फोटाची शक्यता – संरक्षणमंत्री
3 कांद्याचे दर कधी उतरतील, सांगू शकणार नाही – शरद पवार
Just Now!
X