पाकिस्तानात सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला हिंदू समाजाची माफी मागावी लागली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचा तेहरीक-ए-इन्साफ पक्ष सत्तेवर आहे. इम्रान खान यांच्या पक्षाच्या आमिर लियाकत हुसैन या खासदाराला त्याने केलेल्या टि्वटमुळे माफी मागावी लागली तसेच हिंदू समाजाचा अनादर करणारे टि्वटही डिलिट कराव लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजाने आमिर लियाकत हुसैन यांच्या टि्वटचा मोठया प्रमाणावर निषेध केला व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. आमिर लियाकत हुसैन तेहरीक-ए-इन्साफकडून राष्ट्रीय सभागृहाचे सदस्य आहेत. विरोधी पक्षनेत्या मरीयन नवाज यांची खिल्ली उडवण्यासाठी आमिर लियाकत हुसैन यांनी हिंदू देवतेचा फोटो टि्वट केला. त्यावरुन या सर्व वादाला सुरुवात झाली. मरीयम नवाज ही माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आहे.

हुसैन टीव्हीवर निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत. धार्मिक अभ्यासक म्हणूनही ते ओळखले जातात. पाकिस्तानातील हिंदू समाजाबरोबर तिथल्या राजकारण्यांनाही आमिर लियाकत हुसैन यांच्या टि्वटचा निषेध केला. “धार्मिक स्कॉलर म्हणवणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचे टि्वट करणे शोभत नाही. त्याच्या लज्जास्पद कृत्याचा आम्ही निषेध करतो” असे रमेश कुमार वाकंवानी म्हणाले. ते पाकिस्तान हिंदू परिषदेचेही प्रमुख आहेत.

आणखी वाचा- भारत आणि पाकिस्तानमध्ये महत्वाचा करार, युद्धविरामास दोन्ही देशांची तयारी

पाकिस्तानातील हिंदूंकडून झालेल्या निषेधानंतर आमिर हुसैन यांनी ते टि्वट डिलिट केले व हिंदू समाजाची माफी मागितली. “हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याची मला कल्पना आहे. सर्व धर्मांवर माझा विश्वास आहे, हेच मला माझ्या धर्माने शिकवले आहे” असे आमिर हुसैन म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan lawmaker apologises for tweet hurting hindu communitys sentiments dmp
First published on: 25-02-2021 at 15:20 IST