दुबईमधल्या अत्यंत ज्येष्ठ पदावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यानं पाकिस्तानी समाज हा अत्यंत बेशिस्त, गुन्हेगारी वृत्तीचा व स्मगलिंग करणारा असून याउलट भारतीय लोक शिस्तबद्ध असल्याचे म्हटले आहे. ट्विटरच्या माध्यमातून दुबईचे लेफ्टनंट जनरल व सुरक्षा प्रमुख असलेल्या दाही खालफान यांनी भारतीयांची स्तुती करताना पाकिस्तान्यांवर येथेच्छ तोंडसुख घेतले आहे. त्यांनी केलेले ट्विट अरेबिक मध्ये असले तरी त्यावर दिलेल्या कमेंट्सवरून व इंग्लिश अनुवादित ट्विट्सवरून त्यांनी काय म्हटलंय याचा अंदाज आपल्याला येतो.

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाकिस्तानी टोळीला दुबईच्या अधिकाऱ्यांनी अटक केले असून त्यासंदर्भात टिवटरवर माहिती देताना दाही यांनी पाकिस्तानी समाजाचीच उद्धर्गत केली आहेस असे वृत्त युएईव्हायरल या वेबसाइटनं दिलं आहे. दाही हे वादग्रस्त वक्तव्यं करण्यासाठी प्रसिद्ध असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये उमटली आहे.

खालफान यांनी म्हटलंय की, “अरब देशांसाठी पाकिस्तान हा एक गंभीर धोका आहे. करण ते आमच्या देशामध्ये अमली पदार्थांची तस्करी करतात. त्यांना आपल्या देशांमध्ये प्रवेश देताना कठोर नियम लादले पाहिजेत.”

विशेष म्हणजे दाही यांनी भारतीय कसे शिस्तबद्ध असतात आणि पाकिस्तानीच असे का असा प्रश्नही उपस्थित केला आहे. बेशिस्त, गुन्हेगारी व तस्करी यांचा विचार केला तर भारतीय लोक चांगले असतात आणि पाकिस्तानी वाईट असतात, असे का असा सवाल त्यांनी विचारला आहे.
यापुढे जात दुबईमधल्या कुणीही पाकिस्तानी नागरिकांना नोकरीवर ठेवू नये असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांना नोकरीवर न घेणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं मत दुबईच्या लेफ्टनंट जनरलनं व्यक्त केलं आहे.  पाकिस्तानी हे अरबी आखातासाठी धोकादायक आहेत, असं त्यांनी ट्विट केलं आहे.