पितृत्वाच्या खटल्यात उलटतपासणीसाठी हजर राहण्याची अखेरची मुदत टाळून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात गैरहजर राहिले. ८९ वर्षीय तिवारी हेच आपले वडील असल्याचा हा दावा २००८मध्ये रोहित शेखर या ३२ वर्षीय तरुणाने दाखल केला आहे. या प्रकरणात न्यायालयबाह्य़ तोडगा काढण्याची विनंती तिवारी यांनीच केली असली तरी न्यायालयात तसेच न्यायालयनियुक्त आयुक्तांसमोर ते हजर राहात नाहीत.
 या आयुक्तांचे शुल्क तसेच रोहितने मागितलेली अडीच लाख रुपयांची भरपाईही त्यांनी दिलेली नाही, असे न्यायालयास सांगण्यात आले. याप्रकरणी आता २८ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी आहे.