News Flash

Pegasus spyware : “मी पाच वेळा मोबाईल बदलला पण…” प्रशांत किशोर यांचं विधान!

प्रशांत किशोर यांच्या फोनमध्ये १४ जुलै रोजी छेडछाड करण्यात आली होती, अशी देखील माहिती समोर आली आहे.

‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे. (संग्रहीत छायाचित्र)

विरोधी पक्षाचे नेते, पत्रकार, केंद्रीय मंत्र्यांबरोबरच निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना देखील Pegasus spyware चा वापर करणाऱ्या अज्ञात कंपनीने आपलं लक्ष्य बनवलं होतं, असं समोर आलं आहे. प्रशांत किशोर यांनी या पार्श्वभूमीवर एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, मी पाच वेळा माझा मोबाईल बदलला, परंतु हॅकींग सुरू आहे. द वायरच्या रिपोर्टमध्ये फॉरेन्सिकच्या विश्लेषणाच्या हवाल्याने म्हटले आहे की, प्रशांत किशोर यांच्या फोनमध्ये अशातच १४ जुलै रोजी छेडछाड करण्यात आली होती.

प्रशांत किशोर यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या प्रचारात मोठी भूमिका निभावली होती, ज्यानंतर भाजपा स्पष्ट बहुमतासह सत्तेत आली होती. यानंतर भाजपाच्या अनेक विरोधी पक्षांनी प्रशांत किशोर यांच्याशी संपर्क साधला व प्रशांत किशोर यांनी देखील त्यांच्यासाठी काम केलं. नुकत्या पार पडलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमध्ये एमके स्टॅलिनच्या विजयाचे श्रेय देखील त्यांना देण्यात आल्याचं दिसून आलं आहे.

अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगॅससचा रिपोर्ट येणं योगायोग तर नाही; IT मंत्र्यांनी व्यक्त केली शंका

द वायरच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ३०० भारतीय नंबर हॅक झाल्याची यादी मिळाली आहे, ज्यांना लक्ष्य बनवलं गेलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी, केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीयमंत्री प्रल्हाद पटेल यांचा नंबर देखील त्या हॅकिंगच्या यादीत समाविष्ट होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी अगोदर २०१८-२०१९ या कालावधीत या नंबर्सना लक्ष्य केलं गेलं होतं. या प्रकरणी सरकारकडून देखील स्पष्टीकरण आलं होतं. सरकारने हॅकींगमध्ये सहभागी असल्याचा आरोप फेटाळून लावलेला आहे.

Pegasus Snoopgate: “ते काय वाचतात आम्हाला माहिती आहे”, हेरगिरीवरून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

या प्रकरणावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की मोदी सरकार कायदा व राज्यघटनेची हत्या करत आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, राष्ट्रीय सुरक्षेशी खेळले आहे.

भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा कसा वापर करू शकतात, हे ‘द वायर’ या वेबसाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारिता प्रकल्पातून अधोरेखित झाले आहे. हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांच्या मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आला असण्याची शक्यता या माध्यम संस्थांच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

‘पेगॅसस’ काय आहे?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 8:42 pm

Web Title: pegasus spyware i changed my mobile five times but prashant kishor statement msr 87
Next Stories
1 मोदींच्या ‘मन की बात’ने आकाशवाणीला कोट्यवधींचा फायदा; समोर आली कमाईची आकडेवारी
2 १११ मशिदी, चार चर्च, एक देऊळ बांधणारी हिंदू व्यक्ती
3 …तोपर्यंत लोक जळून मरत राहतील; सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारलं