खा. गुजराल यांची टीका
दादरी प्रकरण हे देशासाठी लज्जास्पद आहे आणि या प्रकरणानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा सर्वाधिक मलिन झाली आहे, अशी टीका राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने केली आहे.
खासदार नरेश गुजराल या बाबत म्हणाले की, दादरी येथे जो प्रकार घडला तो देशासाठी लज्जास्पद आहे आणि त्याचा शक्य तितक्या कडक भाषेत निषेध केला पाहिजे.
तथापि, दादरी प्रकरणानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी, भाजप आणि अन्य कोणीही केली नसेल इतकी मोदी यांची प्रतिमा मलिन झाली आहे, असेही गुजराल म्हणाले. या घटनेबाबत वाचाळांकडून मोदी यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असून अशा वाचाळांवरही कोणतीही कारवाई केली जात नाही, असेही गुजराल म्हणाले.काही जण महत्त्वाच्या पदांवर असतानाही बेजबाबदारपणे वक्तव्ये करीत आहेत. मंत्री, मुख्यमंत्री आणि संघ परिवारातील घटकांचा त्यामध्ये समावेश आहे, असेही गुजराल म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2015 रोजी प्रकाशित
‘दादरी’मुळे मोदींची प्रतिमा मलिन
दादरी प्रकरण हे देशासाठी लज्जास्पद आहे आणि या प्रकरणानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा सर्वाधिक मलिन झाली आहे
Written by रत्नाकर पवार
First published on: 18-10-2015 at 02:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peoples blame modi due to dadri matter