गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढीचा सामना करत असलेल्या सामान्य जनतेला आज थोडासा दिलासा मिळाला आहे. सोमवारी पेट्रोलचे दर स्थिर राहिले तर मुंबईत डिझेल ८ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८८.१८ रुपये तर डिझेल ७९.११ रुपये प्रति लिटर असे आजचे दर आहेत. दिल्लीत पेट्रोल ८२.७२ आणि डिझेल ७५.४६ पैसे प्रति लिटर असे दर आहेत.

गत आठवड्यात केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी करात कपात करत पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी केले होते. परंतु, ग्राहकांना याचा आंनद जास्त काळ घेता आला नव्हता. कारण कर कपातीनंतरही इंधन दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ही कर कपात ग्राहकांना अल्प आनंद देणारी ठरली आहे.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी इंधन दराबाबत बैठक घेणार असल्याचे समजते.