25 April 2019

News Flash

महिला आणि मुलींवरच्या अत्याचारांवर पंतप्रधानांचे मौन का?: राहुल गांधी

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये आले तरी त्याची चौकशीही सुरू नाही. ते देशाचे नव्हे तर भाजपा आणि एनडीएचे चौकीदार आहेत

राहुल गांधी

उत्तर प्रदेश-बिहारमध्ये बलात्कार होतात. पण पंतप्रधान यावर एकही शब्द बोलत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला. मी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हटले की ते माझ्या डोळ्याला डोळे भिडवू शकत नाहीत तेव्हा ते इकडे तिकडे पाहू लागले हे तुम्ही टीव्हीवर पाहिलेच असेल. कारण ते चौकीदार नाही तर भागीदार बनले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे ते बोलत होते.

मोदींवर शाब्दिक वार करताना ते म्हणाले, जेव्हा उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मुलींवर अत्याचार होतो. तेव्हा मोदींच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही. भाजपाशासित राज्यांतच महिलांवर बलात्कार का होत आहे, हा प्रश्न तुमच्याच नव्हे तर संपूर्ण देशभरातील महिलांना पडला आहे. महिलांबरोबर मागील ४ वर्षांत जे झाले नाही ते ३००० वर्षांत कधी झाले नव्हते.

तुम्ही देशाला खोटं का सांगितलं असे मी संरक्षण मंत्र्यांना संसदेत विचारलं, पण मला उत्तर मिळालं नाही. मी मोदींना जेव्हा विचारलं, तेव्हा ते माझ्या डोळ्याला डोळे भिडवू शकले नाहीत. हे सर्वांनी टीव्हीवर पाहिलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आले, त्यांना शिक्षा झाली. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्समध्ये आले तरी त्याची साधी चौकशीही सुरू केलेली नाही. ते देशाचे नव्हे तर भाजपा आणि एनडीएचे चौकीदार आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

First Published on August 10, 2018 6:38 pm

Web Title: pm doesnt utter a word when girls are raped in up and bihar says rahul gandhi