News Flash

करोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या तीन टीम्ससोबत आज मोदींची महत्त्वाची चर्चा

शनिवारीच लस निर्मिती प्रकल्पाला दिली भेट...

करोना प्रतिबंधक लस निर्मितीमध्ये गुंतलेल्या तीन टीम्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चर्चा करणार आहेत. लस निर्मितीमध्ये गुंतलेल्या जीननोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील असे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

“करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात गुंतलेल्या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी आज ३० नोव्हेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करतील” असे पीएमओच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी शनिवारीच अहमदाबादच्या झायडस पार्क, हैदराबादच्या भारत बायोटेक आणि पुण्याच्या सिरम इन्स्टि्टयूटला भेट दिली. प्रत्यक्ष तिथे जाऊन लस निर्मितीच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आज मोदी तीन टीम्स सोबत चर्चा करणार आहेत.

पंतप्रधानांनी सिरम इन्स्टीट्यूटमधील वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी तासभर चर्चा केली. सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी पूनावाल कुटुंबीय तिथे उपस्थित होते. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे.

सध्या सर्वांचच लक्ष सिरम इन्स्टीट्यूटकडे लागलं आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम इन्स्टीट्यूट करत आहे. पंतप्रधान मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींनी सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली. मोदींनी यावेळी करोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 10:30 am

Web Title: pm modi to interact with three teams involved in developing covid 19 vaccine dmp 82
Next Stories
1 फेब्रुवारीपर्यंतच्या रात्री गुलाबी थंडीच्या – IMD
2 मोदींनी उल्लेख केलेले ब्राझिलचे Jonas Masetti उर्फ ‘विश्वनाथ’ कोण आहेत? जाणून घ्या सविस्तर
3 Coronavirus : देशभरात २४ तासांत ३८ हजार ७७२ नवे करोनाबाधित, ४४३ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X