हिमाचल प्रदेशच्या कांगरा जिल्ह्यातील नुरपूर भागात एका स्कूल बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात २९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. बस अपघातात झालेल्या मृत्यूबाबत मला अतीव दुःख झाले. सगळ्या मुलांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या मुलांच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो म्हणून प्रार्थना करेन असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांनी भरलेली ही स्कूल बस दरीत कोसळली आहे. या बसमध्ये एकूण ६० मुले होती. ४० जण जखमी झाले आहेत. नुरपूर जवळच्या माल्कवाल भागात सोमवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.अपघातस्थळ हे पंजाबच्या सीमेजवळ आहे. दरी १०० मीटर खोल असून रस्त्यावरुन ही बस दिसत नाहीय. ही बस ४० आसनी असल्याची माहिती नुरपूरचे एसडीए अबीद हुसैन यांनी दिली. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी पठाणकोट आणि तांडा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस, स्थानिक स्वयंसेवक, रुग्णवाहिक, डॉक्टर्स आणि अन्य तात्काळ सेवा मदत कार्यात गुंतल्या आहेत. एका अवघड वळणावर हा अपघात झाला. याबाबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आ