25 February 2021

News Flash

Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले पाच संकल्प

गरीबांसाठी अविरत राशन सेवा सुरू करा असंही त्यांनी सांगितलं.

सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण त्यासाठी सज्ज आहोत, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. भारतीय जनता पक्षाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना काही संकल्प करण्याच्या सूचनाही केल्या.

गरीबांना पोटभर जेवण मिळावं आणि कोणतीही गरीब व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी गरीबांच्या रेशनसाठी अविरत सेवा अभियान सुरू करण्याच्या सुचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या. सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आपलं स्वत:चं रक्षण करण्यासोबतच इतरांचंही रक्षण करण्यासाठी त्यांना फेस मास्क द्यावं. जे जे या करोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी आहे, करोनाचा प्रादुर्भाव असतानाही अविरतपणे आपलं कर्तव्य बजावत आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद अभियान राबविण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

आणखी वाचा- करोनाविरुद्ध दीर्घ काळ चालणाऱ्या या मोठ्या लढाईसाठी देश सज्ज : नरेंद्र मोदी

काही दिवसांपूर्वीच करोनाच्या लाइव्ह ट्रॅकिंगसाठी केंद्र सरकारनं आरोग्य सेतू अॅपची निर्मिती केली. यामध्ये करोनापासून वाचण्यासाठी उपाय आणि नजीकच्या केंद्रांची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, हे आपल्या आपल्या आसपासच्या लोकांना डाउनलोड करायला लावा, असंही पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. याव्यतिरिक्त करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान मदत निधीमध्ये भरीव योगदान येत आहे. त्यात येणारं योगदान हे वाढलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी स्वत:देखील पंतप्रधान मदत निधीमध्ये योगदान द्यावं. तसंच एका कार्यकर्त्यानं आपल्या जवळील आणखी ४० लोकांना यात योगदान देण्यास सांगावं, अशा सूचना त्यांनी केल्या.

मोदींनी सांगितलेले पाच संकल्प

१. गरिबांच्या रेशनसाठी अविरत सेवा अभियान.

२. आपल्यासोबतच घरातल्या इतरांना मास्क द्या.

३. धन्यवाद अभियान राबवा.

४. आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करायला लावा.

५. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने सहयोगी करावे, ४० लोकांकडून पीएम केअर्स फंडमध्ये दान करण्यास सांगा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:48 pm

Web Title: pm narendra modi says five resolutions need to follow by their party workers coronavirus lockdown jud 87
Next Stories
1 युवराजची करोना विरोधातील लढाईत उडी; केली ५० लाखांची मदत
2 करोनाविरुद्ध दीर्घ काळ चालणाऱ्या या मोठ्या लढाईसाठी देश सज्ज : नरेंद्र मोदी
3 “दोन खासदारांचा पक्ष आज ३०० खासदारांचा हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ”
Just Now!
X