पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन दिवसांची अमेरिका भेट अत्यंत फलदायी होती, नागरी अणुऊर्जा ते संरक्षण आणि व्यापार आदी क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली, असे मत अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी व्यक्त केले आहे.
मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चर्चा केली आणि काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. मोदी यांची ही भेट सकारात्मक आणि फलदायी होती, असे वर्मा म्हणाले.
दोन्ही देशांमधील संबंधाने एक वेगळी उंची गाठली आहे, दोन्ही देशांमधील मैत्रीची ही चाचणी होती, असे वर्मा म्हणाले. मोदी यांनी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत आणि ओबामा यांच्यासमवेत व्हाइट हाऊसमध्ये चर्चा केली तेव्हा वर्मा उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये अनेक तास चर्चा केली आणि ती सकारात्मक झाली, असेही ते म्हणाले.