ख्रिसमस ते नवीन वर्षांचा प्रारंभ या काळात युरोपातील देशांच्या राजधानीच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखण्यात आला आहे, असा सावधगिरीचा इशारा ऑस्ट्रियाची राजधानी असलेल्या व्हिएन्नाच्या पोलिसांनी दिला आहे. बंदुकीने किंवा बॉम्बने हल्ला केला जाण्याची शक्यता आहे पण त्यात नेमके कुठे हल्ले होतील हे मात्र सांगता येत नाही, असे असले तरी व्हिएन्नात कुठलेही कार्यक्रम रद्द केले जाणार नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.