07 March 2021

News Flash

४ हजार मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प रद्द

छत्तीसगडमधील नियोजित ४ हजार मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली आहे

| August 9, 2013 02:57 am

छत्तीसगडमधील नियोजित ४ हजार मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली आहे. या प्रकल्पासाठी अपेक्षित कोळसापुरवठा होणे अशक्य असल्याचे लक्षात आल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.
छत्तीसगडमधील सरगुजा येथे हा महाप्रकल्प उभारण्यात येणार होता. तब्बल २० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणावर कोळसा आवश्यक होता, मात्र हा कोळसा ज्या खाणींमधून काढण्यात येणार होता, तेथे घनदाट जंगले असल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या खाणींनाच परवानगी नाकारली. येथे कोळसा खाणी सुरू केल्यास पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल, असा अहवाल आल्याने ही परवानगी नाकारण्यात आली. महाऊर्जा प्रकल्पाचा कच्चा माल असणारा कोळसाच उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने सरकारने हा प्रकल्पच रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोळसा खाणींना परवानगी मिळणे कठीण असल्याची कुणकूण लागल्याने एकाही कंपनीने या महाऊर्जा प्रकल्पासाठी निविदा भरली नव्हती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2013 2:57 am

Web Title: power project of 4000 mw cancelled
टॅग : Power Project
Next Stories
1 ओसामाच्या खातम्यानंतर अल कायदाला घरघर
2 कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला समाजसेवा करण्याची शिक्षा गोव्यातील ‘प्रयोग’
3 दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंवर हल्ल्याची हाफिजची धमकी
Just Now!
X