30 September 2020

News Flash

बारा वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशी: वटहुकूमास राष्ट्रपतींची मंजुरी

कोणताही वटहुकूम लागू केल्यानंतर सरकारला त्याच्याशी निगडीत विधेयक सहा महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत करणे आवश्यक असते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

केंद्र सरकारकडून पॉक्सो अॅक्टमध्ये दुरूस्ती करण्यात आलेल्या वटहुकूमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. नवीन अध्यादेशानुसार १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्यास फाशीची शिक्षा दिली जाईल. १६ वर्षांखालील मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी तुरूंगवासाची किमान शिक्षा १० ऐवजी २० वर्षे करण्यात आली आहे. दोषींना जन्मठेपही होऊ शकते. इतकंच नव्हे तर, १२ वर्षांखालील मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली दोषी आढळल्यास किमान २० वर्षांचा तुरूंगवास किंवा जन्मठेप किंवा फाशीची शिक्षेची तरतूद वटहुकूमाद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर फरारी आर्थिक गुन्हेगारांच्या वटहुकूमावरही राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले आहे.

वटहुकूमाच्या कक्षेत अशी प्रकरणी येतील ज्यामध्ये १०० कोटी रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा समावेश आहे. या वटहुकूमाद्वारे आरोपींना सहा आठवड्याच्या आत फरारी घोषित केले जाईल. त्याचबरोबर आरोप सिद्ध होण्यापूर्वी अशा आरोपींची संपत्ती जप्त करणे किंवा विकण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

फरारी आर्थिक गुन्हेगारांविषयी निगडीत वटहुकूम संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्रात सादर करण्यात आला होता. पण गोंधळ आणि स्थगन प्रस्तावामुळे हा पारित होऊ शकला नव्हता. त्यामुळे सरकारने वटहुकूमाचा पर्याय निवडला. कोणताही वटहुकूम लागू केल्यानंतर सरकारला त्याच्याशी निगडीत विधेयक सहा महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत करणे आवश्यक असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 11:34 am

Web Title: president ramnath kovind promulgates the ordinance to amend pocso act
Next Stories
1 Video : वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी बॉलरचं चिथावणीखोर कृत्य, बीएसएफचा संताप
2 इतक्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होणारच: केंद्रीय मंत्री
3 बलात्काराच्या घटनांवर मौन, जगभरातील ६०० विचारवंतांचे मोदींना खुलं पत्र
Just Now!
X