28 September 2020

News Flash

नरेंद्र मोदींचें ५५ महिन्यात ९३ परदेश दौरे, २०२१ कोटी रुपये खर्च

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ४८ दौरे केले होते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ६८ वेळा विदेश दौरे केले होते.

पंतप्रधान मोदी हे देशात कमी आणि विदेशात जास्त असतात अशी विरोधकांकडून टीका केली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन नेहमी मोठी चर्चा केली जाते. पंतप्रधान मोदी हे देशात कमी आणि विदेशात जास्त असतात अशी विरोधकांकडून टीका केली जाते. गेल्या सहा महिन्यात मोदींचे विदेश दौरे कमी झाले आहेत. निवडणुका होईपर्यंत ते विदेश दौऱ्यावर जाणार नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, निवडणुकीच्या आधी ते दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुरुवारी दक्षिण कोरियात दाखल झाले. २०१९ च्या लोकसभेपूर्वी पंतप्रधानांचा हा शेवटचा अधिकृत परदेश दौरा आहे. पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांचा हा ५५ महिन्यांतील ९३ वा परदेश दौरा आहे. त्यावर २०२१ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

परदेश दौऱ्यात मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची बरोबरी केली आहे. त्यांनी १० वर्षांत ९३ विदेश दौरे केले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षांत ११३ विदेश दौरे केले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ४८ दौरे केले होते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ६८ वेळा विदेश दौरे केले होते. मोदी यांच्या प्रत्येक दौऱ्यावर २२ कोटी रुपये खर्च झाले तर मनमोहन सिंग यांच्यासाठी २७ कोटी खर्च झाले आहेत. दक्षिण कोरियापूर्वी मोदी यांनी ९२ विदेश दौरे केले आहेत. त्यावर एकूण २०२१ कोटी रुपये खर्च झाले. त्यांच्या एका दौऱ्यावर सरासरी २२ कोटी रुपये खर्च झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक दौरे २०१५ मध्ये केले. या वर्षी ते २४ देशांमध्ये गेले. २०१६ व २०१८ मध्ये १८-१८ देशांत गेले. २०१४ मध्ये ते १३ देशांमध्ये गेले होते. मोदी यांनी प्रत्येकी ५ वेळा अमेरिका तर प्रत्येकी ३ वेळा फ्रान्स-जपानचा दौरा केला. मोदींनी पाच वर्षांत एकूण ४९ विदेश दौरे केले. यादरम्यान ते ९३ देशांत गेले. त्यातील ४१ देश असे आहेत, जेथे ते पहिल्यांदा गेले. १० देशांमध्ये ते दोन वेळा गेला. फ्रान्स, जपानमध्ये ३-३ वेळा गेले. चीन-अमेरिकेत ५-५ वेळा गेले. रशिया, सिंगापूर, जर्मनी, नेपाळमध्ये ४-४ वेळा गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 5:03 pm

Web Title: prime minister narendra modi foreign tour pm modi did 93 aborad trip in 57 months equal ex pm doctor manmohan singh
Next Stories
1 ‘हल्लेखोर भारतीय, गाडी भारतीय, स्फोटकेही काश्मीरमधली; मग पुलवामा हल्ल्याशी आमचा संबंध काय?’
2 भारतच दहशतवाद पसरवतोय, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा
3 Pulwama Attack: सार्वजनिक शौचालयातल्या टाइल्सवर पाकिस्तानी झेंडा!
Just Now!
X