पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच  मुख्यमंत्र्यांनी राजीनामा पंजाबचे राज्यपाल विजेंद्र पाल सिंग बदनोर यांच्याकडे पाठवला आहे. बऱ्याच काळापासून सिद्धू यांचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद होते. त्यात अशातच झालेल्या पंजाबच्या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर सिद्धू यांचे खाते देखील बदलण्यात आले होते. ज्यांनतर त्यांनी अगोदर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व नंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे राजीनामा पाठवला होता.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोमवारी सकाळीच सांगितले होती की, त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना राजीनामा पाठली आहे. हा राजीनामा त्यांच्या शासकीय निवसस्थानी पाठवण्यात आला होता. तर त्या अगोदर मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर त्यांच्याकडे खाते काढून त्यांना दुसऱ्या विभागाची जबाबदारी दिल्याने, नाराज झालेल्या सिद्धू यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवलेला आपला राजीनामा ट्विटरवर रविवारी दिला सार्वजनिक केला होता. या राजीनाम्यावर १० जुलै ही तारीख होती. हा राजीनामा त्यांनी मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चार दिवसानंतर पाठवला होता.

सिद्धू यांनीन ट्विटरवर पोस्ट केलेल्या राजीनाम्यात म्हटले होते की, मी पंजाब कॅबिनेटच्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. एवढेच नाहीतर मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर सिद्धू यांनी दिल्लीत जाऊन राहुल यांची भेट देखील घेतली होती, त्यानंतर त्यांनी राजीनामा पाठवला होता.