कारगिल युद्धात शौर्य गाजवलेले सतपाल सिंग यांना सेवानिवृत्तीनंतर पंजाब येथील संगरुर जिल्ह्यात असलेल्या भवानीगढ गावात हेड कॉन्स्टेबल म्हणून नोकरी लागली होती. २००९ मध्ये ते लष्करातून निवृत्त झाले होते. खेळाडूंना मेडल मिळाल्यानंतर चांगल्या पदावर नोकरी लागते. मी कारगिल युद्धात वीर चक्र मिळवलं तरीही मला वाहतूक खात्यात हेड कॉन्स्टेबल पद मिळाले बढती मिळालेली नाही अशी खंत सतपाल सिंग यांनी बोलून दाखवली होती. याची दखल घेत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सतपाल यांना नोकरीत बढती दिली आहे.

सीनियर कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सतपाल सिंग यांना आता असिस्टंट सब इन्स्पेक्टर हे पद देण्यात आले आहे. पंजाबमधल्या सिंगूर या ठिकाणी असलेल्या भवानीगढ गावात ते कार्यरत आहेत. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने सतपाल सिंग यांनी त्यांची खंत बोलून दाखवली होती. मात्र त्यांच्या म्हणण्याची दखल घेत पंजबाचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांना नोकरीत बढती दिली आहे. ज्यानंतर सतपाल आनंदी झाले आहेत.

काय म्हटले होते सतपाल सिंग?

२००९ मध्ये मी सेवानिवृत्त झालो. त्यानंतर मी पंजाब वाहतूक पोलीस खात्यात रुजू झालो. मी सध्या हेड कॉन्स्टेबल आहे. आपल्या देशात जेव्हा खेळाडू मेडल जिंकतात तेव्हा त्यांना चांगल्या पदावरची नोकरी दिली जाते. मी ज्या शेरखानला ठार केलं त्याचा पाकिस्तानने गौरव केला होता, तो त्यांचा एक उच्च अधिकारी होता. मला वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र निवृत्तीनंतर नोकरी मात्र उच्चपदावरची मिळाली नाही याची खंत माझ्या मनात आहे.

मात्र त्यांनी ही खंत बोलून दाखवताच त्याची तातडीने दखल घेत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांना बढती दिली आहे. कारगिल युद्धात त्यांनी दिलेल्या योगदानचे महत्त्व लक्षात घेऊन ही बढती देण्यात आली आहे.