02 March 2021

News Flash

…आणि ग्राहकाच्या डोळयासमोर पीठाच्या गिरणीवर महिलेचं कापलं गेलं शीर

नवरा काही कामासाठी म्हणून बाहेर गेला होता, त्यावेळी....

धान्य दळून देणाऱ्या चक्कीवर काम करत असताना एका महिलेचा अपघाताने शिरच्छेद झाला. चक्कीवरील मशीनमध्ये महिलेचे केस अडकले आणि तिचे शीर धडापासून वेगळे झाले. बलजीत कौर असे मृत महिलेचे नाव आहे. पंजाबच्या फिरोझपूर जिल्ह्यामध्ये ही दुर्देवी घटना घडली. पती सोबत मिळून बलजीत पीठाची गिरणी चालवायच्या.

नेमकं काय घडलं?
नवरा काही कामासाठी म्हणून बाहेर गेला होता, त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. एक ग्राहण दळण घेण्यासाठी म्हणून चक्कीवर आला. बलजीत पीठ काढण्यासाठी म्हणून मशीनच्या दिशेने खाली वाकल्या. त्यावेळी चक्कीची मशीन सुरु होती. अनावधानाने त्यांचे केस मशीनमध्ये अडकले व त्या खेचल्या गेल्या. काही सेकंदात त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले. हा सर्व प्रकार ग्राहकासमोर घडला.

रस्त्यावरुन जाणाऱ्या वाटसुरुंनी लगेच चक्कीच्या दिशेने धाव घेतली. बलजीत यांना लगेच रुग्णालयात नेले पण तिचे प्राण वाचू शकले नाहीत. “त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून कलम १७४ अंतर्गत प्रकरण नोंदवण्यात आले आहे” असे जीरा पोलीस ठाण्याचे एएसआय बलविंदर सिंग यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 1:04 pm

Web Title: punjab womans head decapitated after hair gets stuck in flour mill dmp 82
Next Stories
1 शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांकडून बंदुका हिसकावल्या, बसेसची तोडफोड
2 दिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष
3 करोडपती उद्योजकाच्या मुलाने फक्त ३० हजारांसाठी केली ६५ वर्षीय व्यक्तीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
Just Now!
X