माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटण्यातील १० सर्क्युलर रोड निवासस्थानाबाहेर रविवारी मोठे नाटय पाहायला मिळाले. राबडी देवी यांच्यावर सूनबाई ऐश्वर्या रायने मारहाणीचा आणि जबरदस्तीने बंगल्याबाहेर काढल्याचा आरोप केला आहे. ऐश्वर्या रायने सासूबाईंवर आरोप करण्याची ही दुसरी वेळ आहे. “राबडी देवींनी माझ्या केसांना पकडून मला मारहाण केली. त्यानंतर १० सर्क्युलर रोडवर असणाऱ्या बंगल्यातून अंगरक्षकांकरवी मला घराबाहेर काढले” असा आरोप ऐश्वर्या रायने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा प्रकार समजल्यानंतर ऐश्वर्या रायचे वडील आणि आमदार चंद्रिाका राय यांनी राबडी देवी यांच्यानिवासस्थानी धाव घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिवालय पोलीस ठाण्यात राबडी देवी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दुखापतीमुळे ऐश्वर्याला रुग्णालयात नेण्यात आले होते.

ऐश्वर्या आणि राबडी देवी यांच्यामध्ये वादावादी झाल्याचे समजल्यानंतर सचिवालय पोलीस स्टेशनचे पोलीस पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी आले होते. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या मोठया मुलाबरोबर ऐश्वर्याचे लग्न झाले आहे. पाटण्याच्या व्हीव्हीआयपी झोनमध्ये लालूप्रसाद यादव यांचा बंगला आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास ऐश्वर्या बंगल्याबाहेर आली व तिच्याबरोबर काय घडले त्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. तेजप्रतापला ऐश्वर्या रायपासून विभक्त व्हायचे आहे. त्यासाठी त्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rabri devi pulled my hair assaulted me claim aishwarya rai dmp
First published on: 16-12-2019 at 11:20 IST