News Flash

राहुल गांधी म्हणतात, ‘हा’ करतो माझे सगळे ट्विट : पाहा व्हिडिओ

व्हिडिओच्या माध्यमातून टीकाकारांना खास शैलीत उत्तर

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ट्विटर अकाऊंटवर चांगलेच सक्रिय झाले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान त्यांनी केलेल्या ट्विट्सची चांगलीच चर्चाही होताना दिसते आहे. अशात राहुल गांधींवर ‘बॉट्स’ चा वापर केल्याचाही आरोप झाला. यावरून भाजपनेही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. या आरोपांना उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच विनोदी असून त्याची चर्चा आता नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी त्यांच्या पाळीव कुत्र्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी स्वतःच शूट केला. या व्हिडिओत राहुल गांधींचा कुत्रा त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकतो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.

‘लोक मला विचारू लागले आहेत की राहुल गांधी तुमच्या ट्विटर अकाऊंटवर तुमच्यासाठी कोणती व्यक्ती ट्विट करते? बघा, मी पीडी करतो. ट्विटसाठी.. नाही ट्रीटसाठी पाहा मी काय करतो बघा’ अशा आशयाचा मेसेज लिहित राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत राहुल गांधी यांचा आवाजही ऐकू येतो आहे. राहुल गांधी सांगत असलेली प्रत्येक गोष्ट त्यांचा पाळीव कुत्रा ऐकताना या व्हिडिओत दिसतो आहे. आपल्यावर टीका करणाऱ्यांची खिल्ली राहुल गांधी यांनी उडवली आहे, हेच दिसून येते आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ 

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विट रिट्विट होत असतात त्याबाबत भाजप नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांचे ट्विट विदेशातील बनावट अकाऊंटद्वारे रिट्विट केले जातात असा आरोप भाजपने केला आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्ताचा आधार यासाठी भाजपने घेतला होता. मात्र या आणि अशा प्रकारच्या सगळ्याच आरोपांना राहुल गांधी यांनी या मिश्कील शैलीतील व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 5:00 pm

Web Title: rahul gandhi comes clean on who is responsible for his popularity on twitter
टॅग : Rahul Gandhi
Next Stories
1 अहमदाबादच्या सरकारी रूग्णालयात २४ तासांत ९ नवजात बालकांचा मृत्यू
2 ‘रूपये घासून त्याचे पैसे करणारा तो ‘पंजा’ कुणाचा?’ : पंतप्रधान
3 कच्च्या तेलाचे उत्पादन घटवण्यास सौदी अरेबियाचे समर्थन; पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार?
Just Now!
X