मुजफ्फरनगरमधील दंगलग्रस्त मुस्लिम तरुणांशी ‘आयएसआय’ संपर्कात असल्याच्या कथित वादग्रस्त विधानाबद्दल निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नोटिसला उत्तर देण्यासाठी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आठवडाभराचा वेळ मागितला आहे.
मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मुझफ्फरनगरच्या दंगलींवर भाष्य केले होते. भाजप जातीय द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला होता. तसेच मुझफ्फरनगर दंगल व आयएसआयचे संबंध जोडले होते. हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याबाबत आयोगाने गुरुवारी राहुल गांधी यांना नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र,  राहुल गांधी यांनी या प्रकऱणी स्पष्टीकरण देण्यासाठी पुढील सोमवारपर्यंतचा अवधी मागितला आहे.