बसपचे जौनपूर येथील खासदार धनंजय सिंह आणखी अडचणीत आले आहेत. एका ४२ वर्षीय महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे.
रेल्वेची कर्मचारी असलेल्या या महिलेने धनंजय सिंह यांनी आपले २००४ ते २००९ या कालावधीत लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. बंदुकीचा धाक दाखवून सिंह यांनी सतत अत्याचार केले. तसेच याबाबत वाच्यता केल्यास गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, अशी धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटल्याचे पोलीस उपायुक्त अजय कुमार यांनी सांगितले. या प्रकरणी धनंजय सिंहविरोधात बलात्कार आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले. घरकाम करणाऱ्या महिलेच्या मृत्यू प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि बालकामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिंह सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Nov 2013 रोजी प्रकाशित
बसप खासदारावर बलात्काराचा आरोप
बसपचे जौनपूर येथील खासदार धनंजय सिंह आणखी अडचणीत आले आहेत. एका ४२ वर्षीय महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे.
First published on: 15-11-2013 at 02:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape case lodged against bsp mp dhananjay singh