शहरातील हॉटेलमध्ये चार युवकांनी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आपल्या प्रियकराने आणि त्याच्या तीन मित्रांनी अन्य दोघांच्या सहकार्याने सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीने शुक्रवारी मणिनगर पोलीस ठाण्यात नोंदविली, असे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी आम्ही पाच जणांना अटक केली असून सहावा आरोपी फरारी आहे. सदर मुलगी २६ जुलैपासून बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसांकडे अपहरणाची तक्रार नोंदविली.सदर मुलगी शुक्रवारी पोलीस ठाण्यात आली आणि तिने प्रियकराविरुद्ध तक्रार नोंदविली प्रियकराने आपल्याला कागदपीठ परिसरातील एका हॉटेलवर नेले आणि आपल्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने आपल्या पाच मित्रांना बोलाविले त्यापैकी तिघांनी आपल्यावर बलात्कार केला तर अन्य दोघांनी त्यासाठी मदत केली, असे या मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2015 रोजी प्रकाशित
उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
शहरातील हॉटेलमध्ये चार युवकांनी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First published on: 02-08-2015 at 03:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape on minor in up