News Flash

‘कॉल ड्रॉप’ झाल्यास कंपन्यांवर कारवाई

‘दूरसंचार कंपन्यांनी मोबाईल सेवा वाढवली आहे त्याबाबत त्यांची मी प्रशंसा करतो

| December 20, 2015 03:07 am

दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद

दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांची घोषणा
दूरसंचार कंपन्यांनी व्यवसाय वाढ व ग्राहक हित या दोन्हींचा विचार केला पाहिजे, कॉल ड्रॉप झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असे दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले.
‘दूरसंचार कंपन्यांनी मोबाईल सेवा वाढवली आहे त्याबाबत त्यांची मी प्रशंसा करतो, पण त्याचबरोबर त्यांनी सेवेची गुणवत्ता वाढवली पाहिजे. कॉल ड्रॉपच्या तक्रारी आल्या तर मी कडक कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, त्यांना मी ही समस्या समजावून दिली आहे व आता ते प्रतिसाद देत आहेत’, असे त्यांनी स्पष्ट केले.
फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत त्यांनी सांगितले की, कॉल ड्रॉप कमी करण्याच्या प्रश्नावर कंपन्या अनेक उपाय करीत आहेत. त्यांनी चांगली कामगिरी करणे अपेक्षितच आहे. ट्रायने नियामकाचे काम करावे, नियंत्रकाचे नव्हे, अशी सूचना फिक्कीच्या एका प्रतिनिधीने केली असता त्यांनी ट्राय म्हणजे दूरसंचार तक्रार प्राधिकरणाचे समर्थन केले.
‘जर ट्रायने गुणवत्तेची अपेक्षा केली तर कंपन्यांना त्याची पूर्तता करावी लागेल, दुसरीकडे बोट दाखवून चालणार नाही, जर कंपन्यांनी चांगली सेवा दिली तर त्यांच्या पाठीशी उभा राहणारी मी पहिली व्यक्ती असेन हेही लक्षात ठेवा’, असे प्रसाद म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 3:07 am

Web Title: ravi shankar prasad does plainspeak will be tough on call drops
टॅग : Ravi Shankar Prasad
Next Stories
1 काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा बंडखोरांचा दावा
2 जामिनाची पटकथा शुक्रवारीच ठरली!
3 जामीननाटय़ामुळे कॉँग्रेसमध्ये चैतन्य!
Just Now!
X