News Flash

आगामी वर्षात ‘या’ दिवशी बँकांना असणार सुट्टी

'आरबीआय'ने जाहीर केले कामकाज बंद असणारे दिवस

(संग्रहित छायाचित्र)

जर तुमचे आगामी वर्षात म्हणजेच २०२० मध्ये कुठं फिरायला जाण्याचे नियोजन असेल, तर या अगोदर तुम्हाला बँकांना सुट्टी कधी आहे, हे माहिती करून गरजेचे आहे. जेणेकरून बाहेर गेल्यावर तुम्हाला बँकांशी संबंधित व्यव्हार करताना अडचणी उद्भवणार नाहीत. साधारणपणे देशभरातील विविध राज्यांमधील बँकांच्या सुट्ट्यांमध्ये आपणास थोडफार फरक जाणवत असतो, मात्र तरी देखील काही ठरावीक दिवशी देशभरातील बँकांना तसेच कंपन्यांना सुट्टी ही ठरलेली असते. रिझर्व्ह बँकेने वर्ष २०२० मध्ये बँकेचे व्यवहार कोणत्यादिवशी बंद असणार याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) यांच्यासह काही सणांच्यादिवशी शासकीय तसेच खासगी बँकांचे व्यवहार बंद असतील. तर, विविध राज्यांमधील महत्त्वपूर्ण सणांच्या दिवशी देखील तेथील महत्वानुसार सुट्टी असते. जसे की, आसाममध्ये बिहूच्या दिवशी तर केरळात ओनमला बँका उघडणार नाहीत.

वर्ष २०२० मध्ये या दिवशी बँकांना आहे सुट्टी –
१ जानेवारी, बुधवार – (नववर्ष आरंभ दिन), १५ जानेवारी, बुधवार – (पोंगल, दक्षिणेकडील राज्यांसाठी), २६ जानेवारी, रविवार (प्रजासत्ताक दिन ), ३० जानेवारी, गुरूवार – (वसंत पंचमी), २१ फेब्रवारी, शुक्रवार – (महाशिवरात्र), १० मार्च, मंगळवार – (होळी), २५ मार्च, बुधवार- (उगादी, मध्यप्रदेश), २ एप्रिल, गुरूवार- (राम नवमी), ६ एप्रिल, सोमवार – (महावीर जयंती), १० एप्रिल, शुक्रवार – (गुड फ्रायडे), १४ एप्रिल, मंगळवार – (डॉ.आंबेडकर जयंती), १ मे, शुक्रवार – (महाराष्ट्र दिन, कामगार दिवस), ७ मे, गुरूवार – (बुद्ध पोर्णिमा), ३१ जुलै, शुक्रवार -(बकरी ईद), ३ ऑगस्ट, सोमवार – (रक्षाबंधन), ११ ऑगस्ट, मंगळवार – (जन्माष्टमी), १५, शनिवार ऑगस्ट- (स्वातंत्र्य दिन), ३० ऑगस्ट, रविवार – (मोहरम), २ ऑक्टोबर, शुक्रवार – (महात्मा गांधी जयंती), २६ ऑक्टोबर, मंगळवार – (विजयादशमी), ३० ऑक्टोबर, शुक्रवार – (ईद ए मिलाद), १४ नोव्हेंबर, शनिवार – (दिवाळी), १६ नोव्हेंबर, सोमवार – (भाऊबीज), ३० नोव्हेंबर सोमवार – (गुरूनानक जयंती), २५ डिसेंबर, शुक्रवार – (ख्रिसमस)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 8:42 pm

Web Title: rbi has fixed some days as bank holidays for year 2020 msr 87
Next Stories
1 एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी,आयसीआयसीआय बँक खातेधारकांनो लक्ष द्या…
2 पाकिस्तानच्या चार सैनिकांचा खात्मा, अनेक चौक्या उद्धवस्त
3 महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? : फडणवीस
Just Now!
X