News Flash

आदिवासींची मुंग्यांची चटणी इंग्लंडमधल्या प्रसिद्ध शेफच्या मेन्यूकार्डवर

लाल मुंग्यांच्या चटणीवर गॉर्डन रॅमसे फिदा

भारतातल्या आदिवासींची खास रेसिपी असलेल्या दोन खाद्यप्रकारांनी इंग्लंडचा जगप्रसिद्ध शेफ गॉर्डन रॅनसे याला खूश केलं असून रॅमसेनं या दोन्ही पदार्थांना आपल्या आंतरराष्ट्रीय मेनूमध्ये स्थान दिलं आहे. छापडा चटणी व दोना पुडगा हे पदार्थ आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहारात असतात. काही महिन्यांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर असताना त्यानं हे पदार्थ चाखले आणि तो त्यांच्या प्रेमातच पडला.

चापडा चटणी ही लाल मुंग्यांपासून बनवतात. ही चटणी केवळ चविष्टच नसते तर असं सांगतात की ती आरोग्यासाठीही चांगली असते. चर दोना पुडगा ही चिकनचा प्रकार आहे. यामध्ये स्थानिक पद्धतीचे मसाले वापरून चिकन झाडाच्या पानांमध्ये गुंडाळून ते चुलीवर भाजले जाते. तेलाचा वापर न करता हे चिकन बनवलं जातं हे विशेष. हे पदार्थ चाखल्यानंतर रॅमसेनं ते आपल्या मेनूमध्ये समाविष्ट केले.

काही महिन्यांपूर्वी गॉर्डन भारतभर फिरत होता. भारतीय खाद्यपदार्थावर डॉक्युमेंटरी बनवण्याचं त्याचं काम सुरू होतं. त्याच्या सहकाऱ्यानं सुचवल्यामुळे त्यानं छत्तीसगडमधल्या बस्तरला भेट दिली. डॉक्युमेंटरीमध्ये या चटणीचं कौतुक करताना गॉर्डन म्हणतो ही जगातली सर्वोत्कृष्ट चटणी आहे. तसेच हे दोन्ही खाद्यपदार्थ आरोग्यासाठीही चांगले असल्याचे प्रशस्तीपत्रक त्यानं दिलं आहे.

रॅमसेनं नक्षलींचा धोका असलेल्या मंझीपाल भागामध्ये मोटरसायकलवरून प्रवास केला आणि तीन दिवस या भागात तो राहिला होता. या वास्तव्यामध्ये त्याला लाल मुंग्यांसदर्भात त्याच्या कानावर आलं. ज्यावेळी त्यानं छापडा चटणी आणि मोहाची दारू यांचा आस्वाद घेतला त्यावेळी तो त्यांच्या चवीमुळे अक्षरश: गारदंच झाला. रॅमसे सोबतच्या 16 जणांच्या संपूर्ण टीमनं या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि त्यांनाही ते आवडले. रजनीश पणीकर या स्थानिकाच्या पत्नीनं उर्मिला नाग पणीकर या मूळच्या बस्तरच्या असून त्यांनी हे पदार्थ बनवले होते. रॅमसे या जगप्रसिद्ध शेफनं पसंती दिल्यामुळे भारतातल्या आदिवासींचे हे खाद्यपदार्थ जगाच्या नकाशावर पोचले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 4:47 pm

Web Title: renowned chef gordon ramsay includes red ant chuttany in international menu
Next Stories
1 अब्जाधीश उद्योग सम्राटाचा एक पानी रिझ्युमे पाहिलात का?
2 ‘ही’ कंपनी विकतेय सोन्याचा iPhone X, किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
3 फेकन्युज : कलाम यांच्या आदराचा दुसराही क्षण पहा..
Just Now!
X