02 March 2021

News Flash

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार घोषित

ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू सल्लागार सोडणार व्हाईट हाऊस

संग्रहित छायाचित्र

या वर्षी होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून माईक पेन्स यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर यंदा ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रेटिक पार्टीकडून माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन मैदानात आहेत.

रिपब्लिकन पार्टीच्यावतीनं राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीसाठी सोमवारी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी उमेदवार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील राष्ट्राध्यक्षपदासाठी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बिडेन यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू सल्लागार सोडणार व्हाईट हाऊस

दरम्यान, व्हाईट हाऊसचे सल्लागार केलीनेन कॉनवे यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचे कारण सांगत ट्रम्प यांच्या प्रशासनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी दोन महिने आधी कॉनवे यांचं सोडून जाणं ट्रम्प यांच्यासाठी झटका मानलं जात आहे. कारण, कॉनवे त्यांची राजकीय आणि धोरणात्मक मत मांडणाऱ्या एक सक्षम प्रवक्ते होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2020 10:58 pm

Web Title: republican party announces official renomination of donald trump mike pence for president vice president of us aau 85
Next Stories
1 “उनका ध्यान ‘मोर’ पर है, बेरोजगारी के ‘शोर’ पर नहीं”; काँग्रेसची मोदींवर टीका
2 सावधान! करोनामुक्त रुग्णांना पुन्हा संसर्गाचा धोका; ‘या’ देशात आढळला पहिला रुग्ण
3 मी दुखावले गेलेय, पण झालं ते झालं, आता…; काँग्रेसचं नेतृत्व तूर्तास सोनिया गांधींकडेच
Just Now!
X