जानेवारीत महागाई दरात घट, १९ महिन्यांच्या नीचांकावर
अंडी, भाजीपालासमवेत खाद्य पदार्थांचे दर कमी झाल्याने किरकोळ चलनवाढ दर जानेवारीत मागील महिन्याच्या तुलनेत घटून २.०५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या १९ महिन्यातील हा सर्वांत नीचांक स्तरावर आहे.
डिसेंबर २०१८ च्या संशोधित आकडेवारीनुसार ग्राहक मूल्य सूचकांक (सीपीआय) आधारित किरकोळ चलनवाढ त्या महिन्या २.११ टक्के होती. तर प्रारंभिक आकडेवारीत ती २.१९ टक्के सांगण्यात आली होती. जानेवारी २०१८ मध्ये किरकोळ चलनवाढ ही ५.०७ टक्के होती.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने पुढे म्हटले की, इंधन आणि वीज श्रेणीतही महागाईचा दर यावर्षी जानेवारी घटला असून तो २.२ टक्क्यांवर आला आहे. जो डिसेंबर २०१८ मध्ये ४.५४ टक्के होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्विमासिक मुद्रा नीती समीक्षेत किरकोळ चलनवाढीकडेही लक्ष दिले जाते.
महागाई दरातील घसरणीमुळे रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी कमी करून तो ६.२५ टक्केवर आणला होता. आरबीआयने सामान्य मान्सून राहिल्यामुळे चालू आर्थिक वर्षातील अंतिम तिमाहीसाठी किरकोळ चलनवाढीचा अनुमान कमी करून २.८ टक्के केला आहे.