24 September 2020

News Flash

रिया चौकशीदरम्यान सहकार्य करत नाही?; संतापलेल्या वकिलांनी दिलं ‘हे’ उत्तर

चौकशीसाठी रियाला परत बोलावलं तर....

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची शुक्रवारी ८ तास कसून चौकशी करण्यात आली. परंतु, रिया चौकशीदरम्यान योग्य सहकार्य करत नसल्याचं सांगण्यात येत होतं. या प्रकरणी रियाच्या वकिलांनी सतीश मानशिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रियाने कोणतीच गोष्ट लपवली नाही असं रियाच्या वकिलांचं म्हणणं असल्याचं ‘पिंकव्हिला’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“रिया, तिचे वडील आणि भाऊ या तिघांचाही जबाब नोंदविला गेला आहे. त्यांनी सगळी कागदपत्रेदेखील दाखविली आहेत. या कागदपत्रांमध्ये आयटी रिटर्न्सचा रेकॉर्डदेखील होता. तसंच पोलीस चौकशी असतो किंवा ईडीने केलेली चौकशी रियाने पूर्णपणे सहकार्य केलं आहे. तिने कोणतीही गोष्ट लपवलेली नाही. लपवून ठेवावं असं तिच्याकडे काहीच नाही. जर तिला परत चौकशीसाठी बोलवण्यात आलं तर ती तेव्हादेखील जाईल”, असं वकिलांनी सांगितलं.

आणखी वाचा- सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : वर्षभरात रियाने महेश भट्ट यांना तब्बल इतक्या वेळा केला फोन

दरम्यान, या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. रियाने मुंबईत खरेदी केलेल्या फ्लॅटविषयी आणि महेश भट्ट यांनी केलेल्या फोन कॉल्सविषयी बऱ्याच गोष्टी या चौकशीदरम्यान समोर आल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 11:07 am

Web Title: rhea chakraborty lawyer dismisses news of actor not cooperating with ed official says nothing to hide ssj 93
Next Stories
1 मशिदीच्या पायाभरणीच्या वक्तव्यावरून विरोधकांचा योगींवर निशाणा; म्हणाले…
2 २४ तासांत ६१,५६७ नवे करोनाबाधित, ९३३ जणांचा मृत्यू
3 सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : वर्षभरात रियाने महेश भट्ट यांना तब्बल इतक्या वेळा केला फोन
Just Now!
X