शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणाऱ्या आणि आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या नेत्यांवर, राजकीय पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली आहे. देशात अशी नवी आंदोलनजीवी जमात उदयाला आली आहे, जनतेनं त्यांच्यापासून सावध रहावं, असं मोदींनी म्हटलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते.
A new entity has come up in the country- ‘Andolan Jivi’. They can be spotted wherever there is a protest, be it agitation by lawyers, students, or labourers, explicitly or implicitly. They cannot live without ‘andolan’, we have to identify them & protect nation from them: PM Modi pic.twitter.com/CbCDRthd3X
— ANI (@ANI) February 8, 2021
आणखी वाचा- भारतीय लोकशाही पाश्चिमात्य नव्हे, मानवी संस्था आहे; मोदींचा परदेशी सेलिब्रेटिंना टोला
मोदी म्हणाले, “श्रमजीवी, बुद्धिजीवी यांसारखे शब्द आपल्या खूपच परिचयाचे आहेत. मात्र, मी पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या देशात नवी जमात उदयाला आली आहे ती म्हणजे आंदोलनजीवी. वकिलांचं, विद्यार्थ्यांचं, कामगारांचं कुणाचंही आंदोलन असेल हे आंदोलनजीवी सर्व ठिकाणी उपस्थित असतात. हे कधी पडद्यामागे तर कधी पडद्याच्या पुढेही असतात. यांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनांशिवाय जगू शकत नाहीत तसेच आंदोलनासोबत जगण्यासाठी ते मार्ग शोधत असतात, आपल्याला अशा लोकाना ओळखायला हवं”
आणखी वाचा- मूळ मुद्द्यावर विरोधक गप्प का आहेत? कृषी कायद्यांवर मोदींनी सोडलं मौन
हे लोक सर्व ठिकाणी जाऊन वैचारिक भूमिका मांडत असतात, लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत असतात. नवनव्या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे देशानं अशा आंदोलनजीवी लोकांपासून सावध रहायला हवं. त्यांना स्वतःला नीट उभं राहता येत नाही ते दुसऱ्याच्या आंदोलनात जाऊन बसतात, हीच त्यांची ताकद आहे. हे सर्व आंदोलनजीवी परजीवी असतात. आपण जिथे जिथे सरकार चालवत असाल तुम्हाला अशा परजीवी आंदोलनकर्त्यांचा अनुभव येतच असेल, अशा शब्दांत मोदींनी विविध आंदोलनांना पाठिंबा दर्शवणाऱ्यांना सुनावले आहे.